नव्या वर्षाच्या सुरुवातीला उज्वला घरगुती गॅस सिलेंडरवरची सबसिडी मिळेल अशी अपेक्षा होती मात्र अद्यापही सबसिडी मिळत नसल्याने गॅस ग्राहकांनी नाराजी व्यक्त केली आहे अगोदरच कोरोना, लॉकडाऊन, निर्बंधांमुळे सर्वसामान्यांचे आर्थिक कंबरडे मोडले असून सुमारे दीड वर्षांपासून सबसिडी बंद असल्याने सध्या सिलिंडरसाठी पूर्ण पैसे मोजावे लागत आहेत. कोविड आणि लॉकडाउनमुळे मागील सुमारे दीड वर्षांपासून घरगुती उज्वला गॅस सिलिंडरवर मिळणारी सबसिडी बंद करण्यात आली आहे. तर २०२२ च्या नवीन वर्षापासून सबसिडी पुन्हा सुरु करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र, अद्यापही सबसिडी जमा करण्यात येत नसल्याने नागरिकांची निराशा झाली आहे. त्यामुळे नव्या वर्षातही वाढीव दराने गॅस सिलिंडर घेण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. शहरातील गॅस वितरकांनाही सबसिडी कधी जमा होईल याची माहिती नाही त्यामुळे नागरिकांना घरगुती उज्वला सिलिंडरवरील सबसिडी मिळविण्यासाठी अजून वाट पाहावी लागणार की काय असे वाटते आहे. आर्थिक वर्षाची सुरुवात एप्रिल ते मार्च असल्याने गॅस वितरकांकडून या आर्थिक वर्षानुसार सिलिंडर वितरण करण्यात येते. यामुळे वर्षभरात एका कुटुंबियांना १२ सिलिंडर देण्याचा नियम आहे. एप्रिल ते मार्च या आर्थिक वर्षानुसार याचा हिशोब ठेवण्यात येतो. यामुळे सबसिडीची रक्कम येत्या एप्रिल २०२२ नंतर संबंधितांच्या बँक खात्यात जमा होणार असल्याची शक्यता आहे. यामुळे ग्राहकांना आणखी किमान तीन महिने तरी सबसिडी गॅस सिलिंडरसाठी वाट पहावी लागणार आहेत. नवीन वर्षापासून घरगुती गॅस सिलिंडरवरील सबसिडी जमा करण्यात येणार असल्याची चर्चा सुरू असून यामुळे अनेक ग्राहकांनी संबंधित गॅस वितरकांच्या कार्यालयात जाऊन याबाबत चौकशी सुरु केली आहे. मात्र, वितरकांनाही याबाबत काही माहिती नसल्याने गॅस ग्राहकांना निराश होऊन परतावे लागत आहे.
सेंट झेवियर हायस्कूलमध्ये शालेय स्तरावरील विज्ञान प्रदर्शन उत्साहात संपन्न
मनमाड- येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये शालेय स्तरावरील विज्ञान प्रदर्शन उत्साहात संपन्न झाले....











