loader image
[ays_poll id=7]

नाशिक जिल्ह्यातील पर्यटन स्थळांवर जमावबंदी आदेश लागू !

Jan 19, 2022

नाशिक जिल्ह्यात कोविडचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता नाशिक जिल्ह्यातील सर्व ऐतिहासिक वास्तू, गड, किल्ले, धरणे व पर्यटन स्थळांवर पर्यटकांना जाण्यास बंदी करण्यात आली आहे. हा आदेश काल (दि. 19) पासून लागू झाला असून, पुढील आदेश येईपर्यंत तो कायम राहील, अशी माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष सूरज मांढरे यांनी दिली.

या आदेशानुसार ब्रह्मगिरी व अंजनेरी पर्वत, दुगारवाडी धबधबा, हरिहर, पहिने, साल्हेर किल्ले, भास्करगड व रामशेज किल्ला, भावली आणि वैतरणा धरण, गंगापूर धरण या सर्व ठिकाणी जमावबंदी व संचारबंदी आदेश लागू करण्यात आला आहे. याचे उल्लंघन झाल्यास आपत्ती व्यवस्थापन अधिनियम-2005 व भारतीय दंड संहिता-1860 कलम 188 नुसार कारवाई केली जाईल, असा इशारा देण्यात आला आहे.

दरम्यान राज्यशासन, आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची दि. 14 जानेवारी रोजी बैठक होऊन त्यात नाशिक जिल्ह्यात कोविड आणि ओमायक्रॉनचा वाढता प्रसार पाहता वरील सर्व पर्यटनस्थळे, किल्ले व धरणांवर पर्यटनासाठी येणार्‍या पर्यटकांना अनिश्‍चित काळासाठी जमावबंदी व संचारबंदीचे निर्देश लागू करण्यात आले आहेत. हे आदेश फक्त शासकीय सेवा व अत्यावश्यक सेवेशी संबंधित अधिकारी व कर्मचार्‍यांना लागू राहणार नाहीत.

अजून बातम्या वाचा..

त्र्यंबकेश्वर येथे वार्तांकनासाठी गेलेल्या तीन पत्रकारांवर गावातील काही गुंडांनी भ्याड हल्ला

त्र्यंबकेश्वर येथे वार्तांकनासाठी गेलेल्या तीन पत्रकारांवर गावातील काही गुंडांनी भ्याड हल्ला

मनमाड (प्रतिनिधी), ता. २० – त्र्यंबकेश्वर येथे वार्तांकनासाठी गेलेल्या तीन पत्रकारांवर गावातील...

read more
मनमाडच्या प्रगती बँकेला महाराष्ट्र स्टेट अर्बन को-ऑप बँक्स फेडरेशनचा राज्यस्तरीय प्रथम क्रमांकाचा सर्वोत्कृष्ट बँक पुरस्कार

मनमाडच्या प्रगती बँकेला महाराष्ट्र स्टेट अर्बन को-ऑप बँक्स फेडरेशनचा राज्यस्तरीय प्रथम क्रमांकाचा सर्वोत्कृष्ट बँक पुरस्कार

  मनमाड - शहरात गेली 29 वर्ष कार्यरत असलेली व मनमाड शहराची अर्थ वाहिनी असलेल्या प्रगती अर्बन...

read more
भुमी क्रिकेट अकॅडमीतील आर्या साळुंखे , स्वरांजली पवार व सुहानी बोरा यांची नंदुरबार जिल्हा क्रिकेट आसोसिएशन महिला अंडर 15 संघात निवड

भुमी क्रिकेट अकॅडमीतील आर्या साळुंखे , स्वरांजली पवार व सुहानी बोरा यांची नंदुरबार जिल्हा क्रिकेट आसोसिएशन महिला अंडर 15 संघात निवड

मनमाड - BCCI अंतर्गत असलेल्या महाराष्ट्र क्रिकेट आसोसिएशन आयोजीत आमंत्रितांच्या स्पर्धेसाठी (...

read more
सेंट झेवियर हायस्कूल मनमाड येथे शिकणाऱ्या वेदांत रवींद्र सोनवणेची नाशिक जिल्हा बास्केटबॉल संघात निवड

सेंट झेवियर हायस्कूल मनमाड येथे शिकणाऱ्या वेदांत रवींद्र सोनवणेची नाशिक जिल्हा बास्केटबॉल संघात निवड

मनमाड- महाराष्ट्र बास्केटबॉल असोसिएशन यांच्या मान्यतेने तसेच नाशिक डिस्ट्रिक्ट बास्केटबॉल असोसिएशन...

read more
.