loader image
[ays_poll id=7]

इंदूर – पुणे महामार्गावर वाहतूक कोंडी नित्याचीच, वाहतूक पोलिसांची नियुक्ती करण्यात यावी – मागणी !

Jan 20, 2022


चांदवड – मनमाड मार्गाच्या  दुपदरीकरणाचे काम सुरू असल्याने इंदौर पुणे  महामार्गावर रोजच वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे.  वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या जात असून दोन – दोन तास रांग हटत नसल्याने वाहनधारकांना मोठी डोकेदुखी होत आहे.  कांद्याची आवक वाढल्याने दररोज चारशेहून अधिक ट्रॅक्टर याच मार्गावरील बाजार समितीमध्ये येतात. यामुळे नेहमीच वाहनधारकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे.

चांदवड ते मनमाड मार्गाच्या दुपदरीकरणाचे  काँक्रीटीकरण करण्याचे काम सध्या सुरू आहे. नांदगाव मार्गाचे काम सुरू झाले नसले तरी चांदवड मार्गाचे काम मालेगाव चौफिली पर्यंत आले आहे. सदर काम दुपदरी असले तरी एक पदरी काम होत असून एक बाजूचा मार्ग वाहतूकीसाठी सुरू बठेवण्यात आला असून या कामामुळे चांदवड, नांदगाव आणि पुणे इंदौर राष्ट्रीय महामार्गावर रोजच मोठी वाहतूक कोंडी होत आहे.   इंदौर पुणे महामार्गावरून मोठ्या प्रमाणात जड अवजड वाहतूक होते सतत वर्दळीचा मार्ग असल्याने या वाहतूक कोंडीमुळे  वाहनधारकांना मोठी डोकेदुखीचा सामना करावा लागत आहे. अगोदरच खड्ड्यामुळे इंदौर पुणे महामार्गाची अक्षरशः  चाळण झाली आहे. त्यातच या वाहतूक कोंडीमुळे वाहनधारक हैराण झाले आहे. येण्याजण्यास अनेकदा नको वाटतो हा रस्ता इतका त्रास सहन करावा लागत आहे. दररोज सकाळी आणि सायंकाळी वाहनांची गर्दी होत असल्याने वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. अनेकदा गंभीर आजारी असलेल्या रुग्णांना घेऊन जाणाऱ्या रुग्णवाहिका देखील या वाहतूक कोंडीत अडकल्या जात असल्याने रुग्णाच्या जीवावर देखील बेतत आहे. त्यातच या मार्गावर कृषी उत्पन्न बाजार समिती असल्याने कांदा विक्रीसाठी आलेल्या  शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टरची एकच गर्दी होते तर नांदगाव मार्गाने इंधन कंपन्यांचे प्रकल्प असल्याने इंधन टँकरची ये जा असल्याने मोठी गर्दी असते त्यात जड, अवजड वाहनांची वाहतूक आणि मध्येच  घुसणाऱ्या वाहनांमुळे वाहतूक कोंडी निर्माण होते या चार ही मार्गावर लांबच लांब वाहनांच्या  रांगा लागल्या जातात. त्यामुळे प्रवाशांचा या वाहतूक कोंडीत खोळंबा होतो. या महामार्गावर आज पर्यंत अनेकांचे अपघात झाले आहे. रोजच होणाऱ्या या वाहतूक कोंडी मुळे शहरातील नागरिकांसह वाहनधारकांना मोठा मनस्थाप सहन करावा लावतो तर कोंडी झालेली वाहतूक सुरळीत करण्यासाठी पोलिसांना तारेवरची कसरत करावी लागते. या वाहतूक कोंडीवर लवकरच मार्ग शोधला जावा आणि मालेगाव चौफुलीवर वाहतूक पोलिसांची नेमणूक करण्यात यावी अशी मागणी होत आहे. 


अजून बातम्या वाचा..

बघा व्हिडिओ – चांदवड येथील अन्नत्याग आंदोलनाचा आज चौथा दिवस – शासनाने त्वरित दखल घेण्याची मागणी

बघा व्हिडिओ – चांदवड येथील अन्नत्याग आंदोलनाचा आज चौथा दिवस – शासनाने त्वरित दखल घेण्याची मागणी

चांदवड - चांदवडला कांदा प्रश्नी डॉक्टर श्याम पगार यांचे अन्नत्याग आंदोलनचा आजचा चौथा दिवस असून...

read more
बघा व्हिडिओ-गंगाधरी गावात ७० फुट खोल विहिरीत उतरूण सर्प मिञाने उदमांजराला जीवदान दिले

बघा व्हिडिओ-गंगाधरी गावात ७० फुट खोल विहिरीत उतरूण सर्प मिञाने उदमांजराला जीवदान दिले

  नांदगाव: मारूती जगधने नांदगांव नजिक गंगाधरी येथे विहीरीत पडलेल्या उदमांजराला पशुप्रेमीनी/...

read more
बघा व्हिडिओ – विश्वविजेत्या भारतीय क्रिकेट संघाने पंतप्रधान मोदी यांची घेतली भेट

बघा व्हिडिओ – विश्वविजेत्या भारतीय क्रिकेट संघाने पंतप्रधान मोदी यांची घेतली भेट

विश्वविजेत्या भारतीय क्रिकेट संघाने आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. यावेळी पंतप्रधान...

read more
मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण’ योजनेसाठी अडवणूक, दिरंगाई, पैशांची मागणी केल्यास कठोर कारवाई -मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचना

मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण’ योजनेसाठी अडवणूक, दिरंगाई, पैशांची मागणी केल्यास कठोर कारवाई -मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचना

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचना योजनेच्या पारदर्शक, गतिमान अंमलबजावणीसाठी प्रत्येक जिल्ह्यात...

read more
एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु. कॉलेज,मनमाड मध्ये युगपुरुष स्वामी विवेकानंद स्मृतीदिनानिम्मत विनम्र अभिवादन.

एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु. कॉलेज,मनमाड मध्ये युगपुरुष स्वामी विवेकानंद स्मृतीदिनानिम्मत विनम्र अभिवादन.

  मनमाड:-एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु.कॉलेज,मनमाड मध्ये युगपुरुष स्वामी विवेकानंद...

read more
चार चोरट्यांच्या मुसक्या आवळत चोरीच्या २३ दुचाकी हस्तगत – मनमाड पोलिसांची दमदार कामगिरी

चार चोरट्यांच्या मुसक्या आवळत चोरीच्या २३ दुचाकी हस्तगत – मनमाड पोलिसांची दमदार कामगिरी

मनमाड - मनमाड शहर पोलिसांनी मोठी चोरीच्या २३ दुचाकी जप्त ४ जणांना अटक करत मोठी कामगिरी केली आहे....

read more
.