Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

सोमवार पासून होणार शाळा सुरू – निर्णय स्थानिक प्रशासन घेणार !

Jan 20, 2022

महाराष्ट्रात येत्या सोमवारपासून सर्व शाळा सुरु होणार आहेत. शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी ही माहिती दिली. शाळा सुरू करण्यासंदर्भात सर्वच स्तरांतून मागणी होत होती. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी घेऊन आणि कोरोना प्रतिबंधाचे सर्व नियम पाळून सोमवारपासून शाळा सुरू होतील. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या निर्णयाला परवानगी दिल्याचं मंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितलं.

कोरोना प्रादुर्भाव आणि इतर बाबी तपासून शाळा सुरु करण्याचे अधिकार स्थानिक प्रशासनाला देण्याचा निर्णय आजच्या विभागाच्या बैठकीत झाल्याची माहिती गायकवाड यांनी दिली. दरम्यान, राज्यातली महाविद्यालयं चालू करण्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करणार असल्याचं उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सांगितलं. महाविद्यालयं सुरू करण्याबाबतचा प्रस्ताव अंतिम मान्यतेसाठी मुख्यमंत्र्यांकडे पाठवणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.

अजून बातम्या वाचा..

(बघा व्हायरल व्हिडीओ) “नरेंद्र मोदी यांनी कधी चहा विकलाच नाही” ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाऊ प्रल्हाद मोदी यांचे वक्तव्य

(बघा व्हायरल व्हिडीओ) “नरेंद्र मोदी यांनी कधी चहा विकलाच नाही” ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाऊ प्रल्हाद मोदी यांचे वक्तव्य

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाऊ प्रल्हाद मोदी सातत्याने केंद्र सरकारच्या कार्यशैलीवर टीका...

read more
(बघा व्हिडीओ) मनमाड शहरातील आंतरराष्ट्रीय वेटलिफ्टिंग खेळाडु आकांशा व्यवहारे आणि आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक तृप्ती पाराशर यांची भव्य स्वागत मिरवणुक

(बघा व्हिडीओ) मनमाड शहरातील आंतरराष्ट्रीय वेटलिफ्टिंग खेळाडु आकांशा व्यवहारे आणि आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक तृप्ती पाराशर यांची भव्य स्वागत मिरवणुक

मनमाड : (योगेश म्हस्के) येथील युथ वेटलिफ्टिंग स्पर्धेसाठी मनमाड च्या जयभवानी व्यायाम शाळेतील...

read more
मनमाड शहर पत्रकार संघाच्या वतीने आकांक्षा व्यवहारे व तृप्ती पाराशर यांचा सत्कार

मनमाड शहर पत्रकार संघाच्या वतीने आकांक्षा व्यवहारे व तृप्ती पाराशर यांचा सत्कार

मेक्सिको येथे झालेल्या जागतिक युथ स्पर्धेत आकांक्षा व्यवहारे हिने भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करीत...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]