Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

श्री निलमणी गणेश मंदीर सार्वजनिक ट्रस्टतर्फे रुग्ण सेवेसाठी विक्रमी औषध संकलन

Jan 21, 2022

मनमाड शहरात सन 1997 पासून अखंडीतपणे विविध उपक्रमांद्वारे धार्मिक, सामाजिक व आरोग्य सेवाकार्य करणार्‍या तसेच शहरात मानाचे स्थान असणार्‍या श्री निलमणी गणेश मंदीर सार्वजनिक ट्रस्टतर्फे 2017 पासून सलग भाद्रपद महा गणेशोत्सव 2021 मध्ये यंदा उत्सवाच्या 25 व्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त गरीब रुग्णांसाठी शिल्लक औषध संकलन केंद्र सुरु करण्यात आले होते.शहरातील नागरिकांना त्यांच्याकडे उपचारानंतर शिल्लक असणारी औषधे की ज्यांची मुदत (एक्सपायरी डेट) बाकी आहे, ती श्री निलमणी गणेश मंदीरात ठेवण्यात आलेल्या शिल्लक औषध संकलन पेटीमध्ये देण्याचे आवाहन करण्यात आले होते. शहर व परिसरातील भक्तांनी व नागरिकांनी या आरोग्य सेवा उपक्रमास भरभरुन प्रतिसाद दिला. 4 महिन्यांच्या कालावधीमध्ये या औषध शिल्लक संकलन पेटीमध्ये सुमारे रु.35,000/- पेक्षा जास्त किंमतीची विक्रमी औषधे संकलीत झाली. 2017 पासून आज पर्यंत पाच वर्षात या उपक्रमा द्वारे ट्रस्ट तर्फे 75000 पेक्षा जास्त किमतीची औषधे संकलित करण्यात आली आहेत. ट्रस्टतर्फे या औषधांचे विविध आजारानुसार वर्गीकरण करण्यात आले आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ संचलित जनकल्याण समिती नाशिक यांच्या मार्फत दुर्गम भागात गरीब रुग्णांसाठी मोफत उपचार व औषधे उपलब्ध करुन दिली जातात म्हणून संकलीत औषधे नाशिक येथील जनकल्याण समिती संचालित साप्ताहिक आरोग्य केंद्राचे औषध विभाग प्रमुख मधुकर जोशी यांना ट्रस्टचे अध्यक्ष किशोर गुजराथी, उपाध्यक्ष शेखर पांगुळ व सचिव नितीन पांडे , विश्‍वस्त गोविंद रसाळ यांनी सूपूर्द केले. याप्रसंगी जनकल्याण आरोग्य नाशिक केंद्राचे आरोग्य आयाम प्रमुख नरहर जोशी यांनी जनकल्याण समितीच्या वतीने ट्रस्टचे ऋण व्यक्त केले.
श्री निलमणी गणेश मंदीर सार्वजनिक ट्रस्टतर्फे हा गरीब रुग्णांना मोफत औषध उपलब्ध करुन देणारा शिल्लक औषध संकलन केंद्र उपक्रम सोबतच ट्रस्ट तर्फे मनमाड शहरात गरीब रुग्णांसाठी विविध आरोग्य सेवा उपलब्ध करणार असल्याचे ट्रस्टचे सचिव नितीन पांडे यांनी या प्रसंगी सांगितले. जनकल्याण समिती तर्फे मधुकर जोशी यांनी आभार मानले. श्री निलमणी गणेश मंदीरातर्फे राबविण्यात आलेल्या या उपक्रमात ट्रस्टला अक्षय सानप, अभिषेक पितृभक्त राहुल लांबोळे,शुभम मुनोत रवींद्र वास्कर,बेटी बचाव बेटी पढाव या राष्ट्रीय अभियान चे महराष्ट्र सहसंयोजक प्रवीण अलई , रोहित कुलकर्णी, भरत छाबडा, सुर्यभान वडक्ते, सचिन वडक्ते, सचिन व्यवहारे, रामदास इप्पर,सौरभ मुनोत, संदीप सिनकर, जनकल्याण समितीचे अनिल चांदवडकर आदी मान्यवरांसह ज्ञात अज्ञात गणेश भक्तांचे अनमोल सहकार्य लाभले. या कार्यक्रमास वनवासी कल्याण आश्रमचे प्रकाश कुलकर्णी, शिवसेना जिल्हा उपप्रमुख संतोष बळीद ,आनंद सेवा केंद्राचे प्रमुख कल्पेश बेदमुथा, दीपक शिंदे, उपेंद्र पाठक, महेश बोराडे, अशोक नारंग, तुषार जोशी आदी मान्यवरांसह गणेश भक्त उपस्थित होते.कार्यक्रमाचे संयोजन श्री निलमणी गणेश मंदिर सार्वजनिक ट्रस्टने केले होते.

अजून बातम्या वाचा..

धुळे मुंबई एक्सप्रेसला  मनमाडकरांसाठी तीन अतिरिक्त बोगी राखून ठेवाव्यात राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी

धुळे मुंबई एक्सप्रेसला मनमाडकरांसाठी तीन अतिरिक्त बोगी राखून ठेवाव्यात राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी

मनमाड रेल्वे स्थानक महत्त्वपूर्ण जंक्शन असून या स्थानकातून रोज नाशिक मुंबई आदी ठिकाणी मोठ्या...

read more
मनमाड, नाशिक येथील प्रवाशांसाठी मुंबई – मनमाड स्पेशल ट्रेन सुरू करावी खासदार हेमंत गोडसे यांची केंद्रिय रेल्वे राज्यमंत्र्यांकडे आग्रही मागणी

मनमाड, नाशिक येथील प्रवाशांसाठी मुंबई – मनमाड स्पेशल ट्रेन सुरू करावी खासदार हेमंत गोडसे यांची केंद्रिय रेल्वे राज्यमंत्र्यांकडे आग्रही मागणी

नाशिक - रेल्वे प्रशासनाने नव्याने आखलेल्या रेल्वे गाड्यांच्या टाईमटेबलमुळे नाशिकसह मनमाडकरांवर...

read more
मंगळणे येथील आदिवासी महिला सरपंचाचे तीन महिन्याच्या बाळासह बेमुदत उपोषण सुरूच.

मंगळणे येथील आदिवासी महिला सरपंचाचे तीन महिन्याच्या बाळासह बेमुदत उपोषण सुरूच.

नांदगाव सोमनाथ घोगांणेनांदगाव तालुक्यातील मंगळणे येथील अदिवासी महिला सरपंचाच्या उपोषणाचा आज सातवा...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]