नांदगाव सोमनाथ घोगांणे
भारतीय जनता पार्टीने मध्यप्रदेश, राजस्थान, छत्तीसगढ मध्ये मिळवलेल्या घवघवीत यशा नंतर नांदगाव शहरात भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला.
आज हाती लागलेल्या निकालानुसार मध्य प्रदेश मध्ये एकुण २३० जागांपैक भा.ज.पा – १६४, काँग्रेस – ६५, इतर १, तसेच राजस्थान मध्ये एकुण १९९ जागांपैकी भा.ज.पा – ११५, काँग्रेस – ६९, इतर – १५ व छत्तीसगढ मध्ये ९० जागांपैकी भा.ज.पा – ५४, काँग्रेस – ३५, इतर – १ अशा मोठ्या फरकाने भारतीय जनता पार्टीने यश मिळवले आहे. मिळालेले यश हे इतके महत्त्वाचे आहे कारण भा.ज.पा समोर सगळे विरोधक एकत्र येऊन सुध्दा विरोधक काही कमाल करु शकले नाहीत आणि विरोधकांना भारतीय जनता पार्टीच्या विकासा समोर सपशेल पराभव पत्करावा लागला आहे अशी चर्चा सगळीकडे ऐकण्यात आली.
नांदगाव शहरात आज भा.ज.पा तर्फे ढोल ताशांच्या व डीजे च्या गजरात कार्यकर्त्यांनी जल्लोष केला व नांदगाव शहरातील नागरिकांना पेढे भरवुन आनंद व्यक्त करण्यात आला आणि शहरातील छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, महात्मा गांधी, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करण्यात आले.
या प्रसंगी भा.ज.पा च्या जेष्ठ नेत्या ॲड. जयश्रीताई दौंड, जिल्हा सरचिटणीस संजय सानप, शहर अध्यक्ष राजाभाऊ बनकर, किसान मोर्चा जिल्हा अध्यक्ष सजन कवडे, जिल्हा चिटणीस डॉ. राजेंद्र आहेर, नांदगाव विधानसभा विस्तारक सुरेश काळे, शहर उपाध्यक्ष मनोज शर्मा, भगवान सोनवणे, शहर सरचिटणीस सोमनाथ घोंगाणे, राजेंद्र गांगुर्डे, प्रशांत खैरनार, बळवंत शिंदे, युवा मोर्चा शहर अध्यक्ष अशोक पेंढारकर, ओबीसी मोर्चा शहर अध्यक्ष दिनेश दींडे, भरत काकड सर, ॲड. हिरालाल गांधी, धनंजय गोजरेकर, नंदु शेंडगे, सुरेश कुमावत, अमोल चव्हाण, आकाश पानकर, चेतन पेंढारकर, श्री. घटी, वैभव घोडेस्वार आदी भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते उपस्थित होते.

राशी भविष्य : १० ऑक्टोबर २०२५ – शुक्रवार
मेष : आपल्या मतांविषयी आग्रही राहाल. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. वृषभ : महत्त्वाची कामे...