मेष :- समजुतीत बदल होण्याची शक्यता. मनात आकर्षण भावना वाढू शकते.
वृषभ :- अचानक कौटुंबिक खर्च वाढू शकतो. नवीन करार पूर्णत्वास जाईल.
मिथुन :- महत्त्वाच्या गोष्टीत जोडीदाराचा सल्ला घ्यावा. अचानक धावपळ करावी लागू शकते.
कर्क :- तुमचे कौशल्य पणाला लावा. व्यावसायिक प्रगती करता येईल.
सिंह :- आपल्याला आवडणार्या गोष्टीत अधिक लक्ष घालाल. मधुर वाणीने सर्वांची मने जिंकून घ्याल.
कन्या :- आपल्यातील कालगुणांना वाव द्यावा. काळजी करुन मन विचलित करु नका.
तूळ :- आपले स्वत्व राखून बोलाल. सामाजिक प्रतिष्ठा जपाल.
वृश्चिक :- काही कामे उगाचच अडकून पडल्यासारखी वाटू शकतात. तज्ञ व्यक्तीचा सल्ला मोलाचा ठरेल.
धनू :- स्वत:वरील विश्वास कायम ठेवावा. व्यावहारिक फसणूकीपासून सावध रहा.
मकर :- अचानक धनलाभ संभवतो. जोडीदाराशी क्षुल्लक गोष्टीवरून मतभेद होऊ शकतो.
कुंभ :- वडीलधार्या व्यक्तींना नाराज करू नका. तुमचे संपर्क क्षेत्र वाढेल. मानसिक प्रसन्नता लाभेल.
मीन :- जुनी कामे मार्गी लावाल. नोकरदारांना दिवस चांगला जाईल.




