Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

संस्कृती संवर्धन समितीचा ‘वक्तशिर श्रोता पुरस्कार वितरण’ कार्यक्रम संपन्न

Jan 25, 2022

संस्कृती संवर्धन समिती तर्फे दरवर्षी 10 ते 12 जानेवारी दरम्यान आयोजित करण्यात येणाऱ्या स्वामी विवेकानंद व्याख्यानमाले मध्ये दरवर्षी व्याख्यानाच्या वेळेच्या आधी येणाऱ्या श्रोत्यांसाठी ‘वक्तशीर श्रोता पुरस्कार’ देण्यात येत असतो.

या श्रोत्यांची निवड ही व्याख्यानाच्या तीनही दिवस उपस्थित मान्यवरांच्या हस्ते चिठी काढुन करण्यात येत असते, अशा पद्धतीचा उपस्थित श्रोत्यांना ‘वक्तशरी श्रोता पुरस्कार’ देणारी संस्कृती संवर्धन समिती ही एकमेव संस्था असावी.हा पुरस्कार सोहळा मनमाड येथील सुमन एंटरप्राइजेस यांच्या सौजन्याने घेण्यात येत असतो.यंदाच्या वर्षीचा वक्तशीरी श्रोता पुरस्कार सोहळा हा आज सुमन एंटरप्राइजेस येथे संपन्न झाला.यंदाच्या वर्षीचे हे पुरस्कार सौ. कुलकर्णी मॅडम , श्री गणेश शिंदे ,श्री जी. एस. कुलकर्णी , श्री अभिनव राजगुरू , श्री दिघोळे गुरुजी , श्री भगिनाथ सोनार , सौ. आदिती तावडे , सौ.पुरंदरे या तीन दिवसांच्या प्रत्यक्ष उपस्थित असणाऱ्या भाग्यवान श्रोत्यांना प्राप्त झाला.

या कार्यक्रमास पाहुणे म्हणुन सुमन एंटरप्राइजेसचे संचालक श्री बबन सांगळे , डॉ.श्री सुनील बिडगर हे उपस्थित होते.व्यासपीठावर संस्कृती संवर्धन बहु.संस्थेचे अध्यक्ष श्री प्रवीण व्यवहारे सर , संस्कृती संवर्धन समितीचे अध्यक्ष श्री योगेश म्हस्के हे उपस्थित होते. समितीचे जेष्ठ सदस्य श्री रमाकांत मंत्री यांनी सूत्रसंचालन केले तर श्री प्रमोद मुळे यांनी पुरस्काराची घोषणा केली.या वेळी समितीचे सचिव श्री आनंद काकडे , समिती सदस्य रत्नाकर घोंगडे ,सतिष न्ह्यायदे , सिध्दांत लोढा , सोमनाथ राजनोर आणि पुरस्कारप्राप्त श्रोतागण उपस्थित होते , आभार समितीचे सदस्य डॉ.श्री सुहास जाधव यांनी मानले.

अजून बातम्या वाचा..

एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु. कॉलेज,मनमाड मध्ये किशोरवयीन विदयार्थ्यांनींना सुरक्षितेसाठी मार्गदर्शन कार्यक्रम संपन्न.

एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु. कॉलेज,मनमाड मध्ये किशोरवयीन विदयार्थ्यांनींना सुरक्षितेसाठी मार्गदर्शन कार्यक्रम संपन्न.

  मनमाड:-एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु. कॉलेज, मनमाड मध्ये किशोरवयीन विदयार्थीनींच्या स्वयं...

read more
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ राष्ट्रीय सेवा योजनेचे उत्कृष्ट महाविद्यालय व कार्यक्रम अधिकारी पुरस्कार मनमाड महाविद्यालयस जाहीर

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ राष्ट्रीय सेवा योजनेचे उत्कृष्ट महाविद्यालय व कार्यक्रम अधिकारी पुरस्कार मनमाड महाविद्यालयस जाहीर

राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी डॉ. पवनसिंग परदेशी यांना विद्यापीठस्तरीय सर्वोत्कृष्ट...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]