Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

ऑल इंडिया एस.सी./एस.टि.रेल्वे एम्प्लॉईज असोसिएशन ओपन लाईन मनमाड शाखेच्या प्रांगणात ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न\

Jan 26, 2022

आज दि.26/01/2022, “73” वा प्रजासत्ताक दिन ऑल इंडिया एस.सी./एस.टि.रेल्वे एम्प्लॉईज असोसिएशन ओपन लाईन मनमाड शाखेच्या प्रांगणात ध्वजारोहण कार्यक्रम विविध मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला. ध्वजारोहण IOW विभागाचे कर्मचारी नारायण मावजी पवार यांच्या हस्ते करण्यात आला, तसेच मानवंदना देण्यात आली. तसेच असोसिएशन कार्यालयात सर्व महापुरुषांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करत कार्यक्रम झाला. विशेषतः आज मनमाड ई. टि.एल. विभागातील श्री.संजय संसारे, सतीश झालटे, योगेश महाडिक, योगीराज डी.काळे, अभिमान बोरसे, विजय विसपुते, महेंद्र शिंदे, बी.एस.कडनोर, पंकज कुमार, रंजितकुमार शर्मा, शुभम आहेर, शंकर गाढे, बाळू संसारे, आदी. असंख्य कर्मचाऱ्यांचा असोसिएशन परिवारात जाहीर प्रवेश झाला. कार्यक्रमास आयु.रत्नदीप पगारे, संदीप धिवर, सम्राट गरुड, सागर साळवे, चेतन आहिरे, सतीश एच. केदारे, सतीश झालटे आदी.मान्यवरांनी आपले मनोगत मांडले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभारप्रदर्शन शाखेचे सचिव आयु.चेतन डी. आहिरे यांनी केले.कार्यक्रमाला आयु.प्रदीप जी.गायकवाड, चेतन डी.आहिरे, रत्नदीप एम.पगारे, सम्राट गरुड, दीपक बागुल, रोहन उबाळे, अंबादास मोरे, मंगेश जगताप, सागर बिडवे, आदी. ओपन लाईन शाखेचे सर्व पदाधिकारी आणि सर्व सन्मानीय सभासद उपस्थित होते, तसेच वर्कशॉप शाखेचे आयु.सतीश एच. केदारे, प्रवीण आहिरे, संदीप धिवर, रमेश पगारे, सागर साळवे, कल्याण धिवर, सिद्धार्थ जोगदंड आदी विविध पदाधिकारी आणि असंख्य सर्व सन्मानीय सभासद उपस्थित होते.

अजून बातम्या वाचा..

नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी काळाचा घाला – परधाडी फाट्याजवळ छोटा हत्ती व पल्सर च्या अपघातात दुचाकीस्वार ठार

नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी काळाचा घाला – परधाडी फाट्याजवळ छोटा हत्ती व पल्सर च्या अपघातात दुचाकीस्वार ठार

नांदगाव नांदगाव तालुक्यातील न्यायडोंगरी येथून नांदगावकडे येत असतांना परधाडी फाट्याजवळ टाटा...

read more
आंतर शालेय क्रिकेट स्पर्धा – भुमी क्रिकेट अकॅडमीच्या खेळाडुंचे सर्वोत्कृष्ट प्रदर्शन

आंतर शालेय क्रिकेट स्पर्धा – भुमी क्रिकेट अकॅडमीच्या खेळाडुंचे सर्वोत्कृष्ट प्रदर्शन

मनमाड क्रिकेट समितीद्वारे आयोजीत आंतर शालेय क्रिकेट स्पर्धा नुकत्याच मनमाड येथील महर्षी भगवान...

read more
आंतरशालेय क्रिकेट स्पर्धा – गुड शेफर्ड हायस्कूलने मारली बाजी, उपविजेता एच.ए.के.हायस्कूल क्रिकेट संघ

आंतरशालेय क्रिकेट स्पर्धा – गुड शेफर्ड हायस्कूलने मारली बाजी, उपविजेता एच.ए.के.हायस्कूल क्रिकेट संघ

मनमाड:- मनमाड क्रिकेट समिती आयोजित महर्षी वाल्मिकी क्रीडा संकुल,मनमाड येथे माध्यमिकस्तरीय...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]