Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

मनमाड शहरात 73 वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा….

Jan 26, 2022

प्रजासत्ताक म्हणजे जिथे देशाचा प्रमुख हा वारसाहक्काने निवडला न जाता लोकनिर्वाचित पद्धतीने (प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष निवडणुकांच्या माध्यमातून) निवडला जातो आणि जेथील सर्व शासकीय कार्यालये, पदे देशाच्या सामान्य नागरिकांसाठी खुली असतात. देशाने संविधानाचा स्वीकार करून लोकशाहीतील एका नव्या पर्वाची सुरुवात केली होती तो दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो. संविधान समितीने भारताचे संविधान 26 नोव्हेंबर 1949 या दिवशी स्वीकृत केले आणि पुढे 1950 साली 26 जानेवारी या दिवशी पासुन भारतीय संविधानाला अमलांत आणण्यात आले.
भारतीय राज्यघटनेने स्वातंत्र्य, समता,बंधुता बहाल केली आहेत.
भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी सखोल अभ्यास करून भारतीय संविधानाची निर्मिती केली. संपूर्ण देशभरात आज 73 वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. 26 जानेवारी 1950 रोजी भारताने संविधान अंगीकारलं होतं. यामुळे दरवर्षी 26 जानेवारीला प्रजासत्ताक दिन साजरा केला जातो.

मनमाड शहरात देखील आज 73 वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. छत्रे हायस्कुल , मनमाड शहर पोलीस स्टेशन , उप-विभागीय पोलीस अधिकारी कार्यालय , मनमाड न्यायालय , मनमाड नगर परिषद , मनमाड रेल्वे स्टेशन , सिनियर रेल्वे इन्स्टिट्यूट मैदान , येथे शासकीय नियमानुसार उपस्थित मान्यवर , अधिकारी ,कर्मचारी आणि शहरातील नागरिक यांच्या उपस्थितीत झेंडा वंदन पार पडले.

मनमाड शहरातील एकात्मता चौकामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने भारत मातेच्या प्रतिमेची पुजन करण्यात आले .ऑल इंडिया एससी एसटी असो. च्या वतीने सिनियर रेल्वे इन्स्टिट्यूट कार्यालय , कारखाना शाखा कार्यालय आणि ओपन लाईन कार्यालय येथे ध्वजारोहण करण्यात आले . सी.आर.एम.एस.च्या वतीने कारखाना शाखा येथे ध्वजारोहण करण्यात आले. आनंद काकडे आणि पल्लवी केटरिंगच्या सर्व सदस्यांच्या वतीने प्रजासत्ताक दिनानिमित्ताने भारतमातेचे पुजन करून देशासाठी शहीद झालेल्या विरांना अभिवादन करण्यात आले.

अजून बातम्या वाचा..

मध्यप्रदेशातही होणार ओबीसी आरक्षणाशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका : सर्वोच्च न्यायालयाने दिले आदेश

मध्यप्रदेशातही होणार ओबीसी आरक्षणाशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका : सर्वोच्च न्यायालयाने दिले आदेश

ओबीसी आरक्षणाचं जे महाराष्ट्रात झालं तेच मध्य प्रदेशातही झालं असून स्थानिक स्वराज्य निवडणुकांमध्ये...

read more
प्रदर्शनाआधीच ” धर्मवीर, मुक्काम पोस्ट ठाणे ” चित्रपटाच्या पोस्टरने रचला नवा विक्रम!

प्रदर्शनाआधीच ” धर्मवीर, मुक्काम पोस्ट ठाणे ” चित्रपटाच्या पोस्टरने रचला नवा विक्रम!

१३ मे २०२२ रोजी मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होणाऱ्या धर्मवीर, मुक्काम पोस्ट ठाणे या चित्रपटाने रचला...

read more
भुसावळ डिविजन इंटरडिपार्टमेंटल क्रिकेट स्पर्धा : मनमाड पँथर ने पटकावले प्रथम बक्षीस

भुसावळ डिविजन इंटरडिपार्टमेंटल क्रिकेट स्पर्धा : मनमाड पँथर ने पटकावले प्रथम बक्षीस

भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्ताने ऑल इंडिया एससी एसटी रेल्वे एम्प्लाईज...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]