loader image
[ays_poll id=7]

राशिभविष्य : २७ जानेवारी २०२२ !

Jan 27, 2022


मेष :- कोणाकडून फसले जाणार नाही याची दक्षता घ्या. व्यापारी वर्गाने चिकाटी सोडू नये.

वृषभ :- उगाचच भांडणात पडू नका. कार्यालयीन सदस्यांशी मतभेद होण्याची शक्यता.

मिथुन :- मनातील चुकीच्या विचारांना हद्दपार करा. घेतलेल्या मेहनतीचे चीज होईल.

कर्क :- स्थावर मालमत्तेत गुंतवणूक करण्याचा विचार कराल. समोरच्या व्यक्तिमधील चुका काढत बसू नका.

सिंह :- नवीन नोकरीच्या संधी दिसून येतील. संवाद कौशल्याने समोरच्या व्यक्तीवर प्रभाव पाडाल.

कन्या :- कष्टाच्या मानाने यश पदरी पडेल. स्पर्धेत यश मिळवाल. अचानक खर्च उद्भवू शकतात.

तूळ :- अनावश्यक खर्च कमी करा. नवीन गोष्टीत सावधानतेने पाऊल टाका.

वृश्चिक :- केलेला संकल्प पूर्ण होईल. आपले विचार लोकांसमोर मांडाल.

धनू :- आपला आत्मविश्वास कायम ठेवा. आहारावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे.

मकर :- आपल्या निर्णय क्षमतेवर विश्वास ठेवा. व्यावसायिक निर्णय भविष्यात फायदेशीर ठरतील.

कुंभ :- बोलण्यातून लोकांशी जवळीक साधाल. व्यवसायिकांना अधिक मेहनत घ्यावी लागेल.

मीन :- नवीन संधी चालून येऊ शकते. मन काहीसे विचलीत राहण्याची शक्यता.


अजून बातम्या वाचा..

.