Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

गोदावरी एक्स्प्रेस त्वरित सुरू करा : एकमुखी मागणी

Jan 28, 2022

कोरोना विषाणूच्या प्रसारमुळे गेल्या अनेक महिन्यांपासुन मनमाड ते नाशिक ते मुंबई प्रवास करणाऱ्या हजारो प्रवासी आणि दररोज प्रवास करणारे पास धारक यांची जीवन वाहिनी असणारी ‘मनमाड-कुर्ला गोदावरी एक्सप्रेस’बंद आहे. गोदावरी एक्सप्रेस ने दररोज मनमाडहुन नाशिक आणि मुंबई साठी हजारो नागरिक , विदयार्थी , कामगार वर्ग हे प्रवास करत असतात , परंतु गेल्या अनेक महिन्यापासून गोदावरी एक्सप्रेस बंद असल्याने या हजारो नगरिकांची खुप मोठी गैरसोय होत आहे.

काही महिन्यांपासुन भारतीय रेल्वे कडुन अनेक रेल्वे गाड्या या कोरोना परिस्थितीचे नियम पाळून सुरू करण्यात आल्या , या गाड्यांप्रमाणेच मनमाड- कुर्ला गोदावरी एक्सप्रेस ही गाडी सुरू करण्यात यावी यासाठी आज मध्य रेल्वेचे महाप्रबंधक हे मनमाड येथे आले असता त्यांना रेल्वे प्रवासी संघटनेच्या वतीने गोदावरी एक्सप्रेस सुरू करण्याचे निवेदन देण्यात आले. गोदावरी एक्सप्रेस चालू करण्यात यावी तसेच पासधारकांसाठी दुसऱ्या गाड्यांमध्ये प्रवासाची परवानगी देण्यात यावी , गेल्या अनेक महिन्यापासुन रेल्वेच्या सर्व विभागांना गोदावरी एक्सप्रेस सुरू करण्यासाठी निवेदन देण्यात आले असुन आज पर्यंत त्याचा कुठल्याही प्रकारे सकारात्मक विचार झालेला नाही , अजूनही यावर काही होकारत्मक विचार न झाल्यास चाकरमान्यांकडुन तीव्र स्वरूपातील आंदोलन करण्याचा इशारा या निवेदनात देण्यात आलेला आहे.

या प्रसंगी प्रवासी संघटनेचे अध्यक्ष नरेंद्र खैरे , उपाध्यक्ष संदिप व्यवहारे , ऍड ललीत आंबेकर आणि पदाधिकारी उपस्थित होते.

अजून बातम्या वाचा..

नांदगाव. मारुती जगधने सौ.अंजुमताई सुहास कांदे यांच्या अध्यक्षतेत सार्वजनिक मनमाड शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने अतिशय जल्लोषात शिवजयंती साजरी

नांदगाव. मारुती जगधने सौ.अंजुमताई सुहास कांदे यांच्या अध्यक्षतेत सार्वजनिक मनमाड शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने अतिशय जल्लोषात शिवजयंती साजरी

*आमदार सुहास आण्णा कांदे व सौ. अंजुमताई कांदे यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली. या नंतर सकाळी १०...

read more
मनमाड महाविद्यालयात स्व. रेणुकाआजी भाऊसाहेब हिरे यांना पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन

मनमाड महाविद्यालयात स्व. रेणुकाआजी भाऊसाहेब हिरे यांना पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन

मनमाड: महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित, कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड येथे स्व....

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]