मनमाड: महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित, कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड येथे स्व. रेणुकाआजी भाऊसाहेब हिरे यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली. या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अरुण पाटील यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला. आपल्या अध्यक्षीय मनोगतातून प्राचार्य डॉ. अरुण पाटील यांनी आजींच्या जीवनकार्याविषयी माहिती दिली. कै. रेणुका आजींनी कर्मवीर भाऊसाहेब हिरे यांना संपूर्ण जीवनभर सामाजिक, शैक्षणिक, राजकीय क्षेत्रात भरभक्कम अशी साथ दिली. वरिष्ठ महाविद्यालयाचे मराठी विभागाचे डॉ. किरण पिंगळे यांनी आपल्या मनोगतातून स्व. रेणुकाआजी हिरे यांच्या जीवन कार्याचा आढावा घेतला.
या कार्यक्रमासाठी वरिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. बी. एस. देसले, कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. सुभाष अहिरे, व्यावसायिक अभ्यासक्रम विभागाचे उपप्राचार्य प्रा. पी. के. बच्छाव,
पर्यवेक्षक व्ही. आर. फंड, कुलसचिव श्री समाधान केदारे, महाविद्यालयातील प्राध्यापक, प्रशासकीय कर्मचारी उपस्थित होते.

ग्रंथालयांच्या अडचणी सोडवण्यासाठी शासन प्रयत्नशील उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील
पुणे - जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत ग्रंथालयांना अनुदान उपलब्ध करून देण्यासाठी, शासन प्रयत्न...