Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

मनमाड महाविद्यालयात राष्ट्रपिता महात्मा गांधींना अभिवादन !

Jan 30, 2022

महात्मा गांधी विद्यामंदीर संचालित,कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय,मनमाड येथे 30 जानेवारी रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधी पुण्यतिथी व हुतात्मा दिन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.ए.व्ही.पाटील व उपप्राचार्य डॉ.पी.जी.आंबेकर यांच्या मार्गदर्शनाखाली साजरा करण्यात आला.

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना पुण्यतिथीनिमित्त तसेच देशाच्या स्वातंत्र्यासाठी प्राणार्पण केलेल्या हुतात्म्यांचे स्मरण अभिवादन करुन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक रा.से.यो. कार्यक्रम अधिकारी डॉ.पी.बी परदेशी यांनी केले. कार्यक्रमाप्रसंगी कनिष्ठ महाविद्यालयाच्या उपप्राचार्या प्रा.श्रीमती ज्योती बोडखे-पालवे यांनी स्वातंत्र्यसंग्रामातील महात्मा गांधीजींचे योगदान व हुतात्मा दिनाचे राष्ट्रभक्तीतील स्थान याविषयीची माहिती दिली.

यावेळी डॉ.व्ही.टी.थोरात, डॉ.जे.वाय.इंगळे, कार्यालयीन अधिक्षक एकनाथ अहिरे महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे संयोजन राष्ट्रीय सेवा योजना विभागातर्फे करण्यात आले.
कार्यक्रमाचे आयोजन करताना करोना नियमांचे पालन करण्यात आले.

अजून बातम्या वाचा..

श्री निलमणी गणेश मंदीर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे गरीब रुग्णांना मोफत सेवेसाठी रु.1,09,000/- किंमतीची औषधे सेवा भारतीकडे सुपूर्द

श्री निलमणी गणेश मंदीर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे गरीब रुग्णांना मोफत सेवेसाठी रु.1,09,000/- किंमतीची औषधे सेवा भारतीकडे सुपूर्द

मनमाड - मनमाड शहरात धार्मिक, सांस्कृतिक, पर्यावरण, सामाजिक व शैक्षणिक आरोग्य सेवा क्षेत्रात सन...

read more
अभिनव बाल विकास मंदिर शाळेचा ‘चित्रकला’ परीक्षेत शंभर टक्के निकालाची परंपरा कायम!

अभिनव बाल विकास मंदिर शाळेचा ‘चित्रकला’ परीक्षेत शंभर टक्के निकालाची परंपरा कायम!

शासकीय कला संचालनालय, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने सप्टेंबर २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या एलिमेंटरी...

read more
नांदगाव–मनमाडच्या राजकारणात हालचाल; मंत्री गिरीश महाजन यांची विविध पक्षांच्या नेत्यांची गुप्त भेट

नांदगाव–मनमाडच्या राजकारणात हालचाल; मंत्री गिरीश महाजन यांची विविध पक्षांच्या नेत्यांची गुप्त भेट

नांदगांव : सुमितकुमार जगधने नांदगाव व मनमाड परिसरातील राजकीय वर्तुळात खळबळ उडवणारी महत्त्वाची भेट...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]