नांदगाव येथील सौ.क.मा.कासलीवाल विद्यालयात महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन करून दोन मिनिटे मौन धारण करून शहीद हुतात्म्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली तसेच राष्ट्रपिता महात्मा गांधी पुण्यतिथी निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी महात्मा गांधी यांच्या आवडीच्या “रघुपती राघव राजाराम पतित पावन सिताराम” या भजनाचे गायन केले. त्याचप्रमाणे शिशु विहारातील शिक्षिकांनी “युग बदलाने आया गांधीजी” हे भजन गायले. कु.पुष्पक संजय त्रिभुवन या विद्यार्थ्याने गांधीजींची वेशभूषा केली होती. कु.अनस मतीन शेख व कु. माधव गायकवाड या विद्यार्थ्यांनी त्यांच्या जीवन चरित्राला उजाळा दिला व त्यानंतर सर्व विद्यार्थ्यांसमवेत शिक्षकांनी परिसर स्वच्छता केली. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी शाळेचे मुख्याध्यापक सावंत.व्ही.पी. व शिक्षक वृंद यांनी प्रयत्न केले.
मनमाड शहर भाजपा मंडल तर्फे 79 व्या स्वातंत्र्य दिना निमित्ताने ध्वजारोहण कार्यक्रम व भव्य तिरंगा रॅली चेआयोजन युवकांचा उस्फुर्त प्रतिसाद
भारतीय जनता पार्टी मनमाड शहर मंडलाच्या वतीने स्वतंत्र हिंदुस्थान च्या 79 व्या स्वातंत्र्य दिना...










