Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

तब्बल तीन महिन्यानंतर मनमाड आगारातुन बस रवाना…..

Feb 1, 2022

मनमाड : गेल्या तीन महिन्यांपासुन संपुर्ण राज्य भर एस टी कर्मचाऱ्यांना आपल्या विविध मागण्यांसाठी बंद पुकरलेला आहे , या मुळे सामान्य नागरिकांच्या लालपरीचे चाके थांबलेले असुन , सामान्य प्रवाशांचे यामुळे हाल होत आहे.

मनमाड आगारात देखील गेल्या तीन महिन्यांपासुन एस टी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे एकही बस आगारच्या बाहेर गेली नव्हती , आज खाजगी वाहक आणि चालक यांच्या मदतीने मनमाड ते नाशिक ही पहिली बस पोलीस संरक्षणामध्ये रवाना करण्यात आली.मनमाड हे मध्यवर्ती बस स्थानक असल्याने येथुन नाशिकला आणि संपूर्ण राज्यामध्ये अनेक प्रवासी नियमित प्रवास करत असल्याने तीन महिन्यांपासुन हे प्रवाशी अनेक समस्यांना तोंड देत प्रवास करत आहेत , खासगी वाहन धारकांनी या गोष्टीचा फायदा घेत कोणत्याही प्रकारे प्रवाशांच्या सुरक्षेचा विचार न करता गाडी मध्ये जास्तीचे प्रवाशी बसवुन आणि प्रवासाचे दुप्पट पैसे घेऊन सामान्य प्रवाशांच्या खिशाला कात्री लावली आहे.आज पासुन मनमाड आगारातुन खासगी वाहक आणि चालक यांचा मदतीने चार बस रवाना झाल्या असुन , लवकरच अनेक सर्व ठिकाणी बस सुरू करण्यात येतील अशी माहिती मनमाड आगार प्रमुख श्री प्रितम लाडवंजारी यांनी दिली.

अजून बातम्या वाचा..

मनमाडला महावीर भवन जवळ चेन स्नेचिंगचा प्रयत्न फसला : महिलेने प्रसंगावधान राखत केला विरोध

मनमाडला महावीर भवन जवळ चेन स्नेचिंगचा प्रयत्न फसला : महिलेने प्रसंगावधान राखत केला विरोध

मनमाड शहरात आज सकाळी येथील महावीर भवन समोर सकाळी ११ वाजेच्या दरम्यान दोन अज्ञात दुचाकीस्वारांनी या...

read more
मनमाड महाविद्यालयाच्या रासेयो स्वयंसेवकांनी शिंगवे येथील दत्त मंदिर टेकडीवर खोदले सीसीटी चर

मनमाड महाविद्यालयाच्या रासेयो स्वयंसेवकांनी शिंगवे येथील दत्त मंदिर टेकडीवर खोदले सीसीटी चर

महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित,कला,विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड यांचे राष्ट्रीय सेवा...

read more
वेटलीफ्टींग – राष्ट्रीय प्रशिक्षण शिबिरासाठी निवड झालेल्या प्रशिक्षक आणि खेळाडूंचा शिवसेनेतर्फे सत्कार

वेटलीफ्टींग – राष्ट्रीय प्रशिक्षण शिबिरासाठी निवड झालेल्या प्रशिक्षक आणि खेळाडूंचा शिवसेनेतर्फे सत्कार

भारतीय क्रीडा प्राधिकरण आयोजित राष्ट्रीय प्रशिक्षण शिबिरासाठी जय भवानी व्यायाम शाळेची माजी खेळाडू...

read more
संतशिरोमणी रविदास महाराज यांच्या जयंतीनिमित्त मनमाड शहर शिवसेनेच्या वतीने प्रतिमापूजन

संतशिरोमणी रविदास महाराज यांच्या जयंतीनिमित्त मनमाड शहर शिवसेनेच्या वतीने प्रतिमापूजन

आमदार सुहास आण्णा कांदे यांच्या संपर्क कार्यालयात शिवसेनेच्या वतीने प्रतिमापूजन करून जयघोष करण्यात...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]