Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

नगरच्या दोन गिर्यारोहकांचा दुर्दैवी मृत्यू : मनमाड जवळील हडबीची शेंडी सुळका येथील घटना

Feb 2, 2022

शेंडीच्या डोंगरावर ट्रेकिंगसाठी आलेल्या दोन  तरुणांचा तोल जाऊन सुमारे एकशे दहा फूट खाली  पडल्याने जागीच मृत्यू झाला तर यातील एक तरुण जखमी झाला असून प्रस्तरारोहण करणारे इतर १२ जण सुखरूप आहे रापली, कातरवाडी, मनमाड शहरातील  तरुणांनी रेस्क्यू ऑपरेशन करत सर्वांना सुखरूप पायथ्याशी आणण्यात यश मिळवले.

याबाबत वृत्त असे की अहमदनगर येथील असलेले इंद्रप्रस्थ टेकर्स या ग्रुपचे एकूण १५ सदस्य हे आज सकाळी मनमाड शहराजवळ असलेल्या हडबीची शेंडी, थमसप म्हणून प्रसिद्ध असलेल्या शेंडीच्या डोंगरावर ट्रेकिंगसाठी आले होते या ग्रुपमध्ये ८ मुली तर ७ मुले होते यातील मुलांमध्ये दोन जण सराईत ट्रेनर होते सकाळी शेंडीच्या डोंगरावर पायथ्यापासून चढाई करण्यास सुरुवात केली यातील दोघे ट्रेनर असलेले
मयूर दत्तात्रय म्हस्के, अनिल शिवाजी वाघ या दोघांनी ग्रुपमधील सर्वांची वर चढण्यासाठी असलेल्या जुन्या बोल्डिंगवर रोप लावला होता रोपद्वारे सर्वजण सुखरूप शेंडीच्या डोंगरावर चढले सर्वांनी वर चढल्यावर आंनद व्यक्त केला मनसोक्त फोटो काढले मात्र परतीच्या मार्गावर असतांना यातील ८ मुली ४ तरुण खाली उतरले मात्र पाठीमागे थांबलेले दोघे ट्रेनर बोल्डिंग मधून रोप काढत असतांना वरचे बोल्डिंग दगड ठिसूळ असल्याने सटकल्यामुळे ट्रेनर असलेले मयूर दत्तात्रय म्हस्के, अनिल शिवाजी वाघ हे दोघे डोंगरावरून खाली पडले गेले तर यांच्यासोबत असलेला प्रशांत पवार हा तरुण देखील जखमी झाला हे दोघे खाली पडत असतांना डोंगरावर जाणाऱ्या काही व्यक्तींनी बघितले त्यांनी तात्काळ फोन फिरवत रापली, कातरवाडी येथील तरुणांना बोलावून घेतले अपघात झाल्याचे लक्षात येताच सदर गावातील आणि मनमाड शहरातील तरुण घटनास्थळी दाखल होऊन त्यांनी रेस्क्यू ऑपरेशन करत यातील एका मृताला मनमाडच्या उपजिल्हा रुग्णालयात आणले तर दुसरा व्यक्तीला रेस्क्यू करण्यात वेळ लागल्याने अंधार पडल्यावर सदर मृत तरुणाला शोधण्यात यश आले आणि तेथून एम्ब्युलन्सने मनमाडच्या उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले आहे जखमी प्रशांत पवार याच्यावर रुग्णालयात उपचार करण्यात आले आहे तर यातील १२ तरुण तरुणींना रापली येथे माजी सरपंच संघरत्न संसारे यांच्या ग्रुपने राहण्याची खाण्याची व्यवस्था केली. तसेच कातरवाडी येथील भागवत झालटे आणि मनमाड चे पियूष गंगीले यांसह परिसरातील तरुणांनी मदतकार्य केले.

अजून बातम्या वाचा..

बांबूच्या काड्यांतून साकारला कष्टाचा आणि कौशल्याचा धडा – संस्कारखेळवाडीत कुटीरउद्योगाचे जिवंत प्रात्यक्षिक

बांबूच्या काड्यांतून साकारला कष्टाचा आणि कौशल्याचा धडा – संस्कारखेळवाडीत कुटीरउद्योगाचे जिवंत प्रात्यक्षिक

ग्रामीण जीवनातील स्वयंपूर्णतेची परंपरा आणि पारंपरिक कुटीरउद्योगाची ओळख बालकांना व्हावी, या...

read more
फ्रान्सच्या आकाशात मराठी शेतकऱ्याची भरारी; आंतरराष्ट्रीय फ्लाईंग फेस्टिव्हलमध्ये मंगेश दिघे यांची ऐतिहासिक कामगिरी

फ्रान्सच्या आकाशात मराठी शेतकऱ्याची भरारी; आंतरराष्ट्रीय फ्लाईंग फेस्टिव्हलमध्ये मंगेश दिघे यांची ऐतिहासिक कामगिरी

फ्रान्समधील ग्रेनोबलनजीक सेंट हिलारे येथे पार पडलेल्या ५३ व्या 'कुपेकार २०२६' या आंतरराष्ट्रीय...

read more
नार-पार-गिरणा नदीजोड प्रकल्पास केंद्राची मंजुरी – नांदगाव तालुक्याच्या पदरी निराशाच

नार-पार-गिरणा नदीजोड प्रकल्पास केंद्राची मंजुरी – नांदगाव तालुक्याच्या पदरी निराशाच

नाशिक आणि जळगाव या दोन जिल्ह्यांसाठी अत्यंत उपयुक्त अशा नार-पार-गिरणा नदीजोड प्रकल्पाला केंद्र...

read more
तालुका तात्काळ दुष्काळी जाहीर करावा – शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) वतीने तहसीलदारांना निवेदन

तालुका तात्काळ दुष्काळी जाहीर करावा – शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) वतीने तहसीलदारांना निवेदन

पावसाने पाठ फिरवल्यामुळे नांदगाव तालुक्यात भीषण दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. शेतकऱ्यांसमोर...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]