loader image
[ays_poll id=7]

शैक्षणिक क्षेत्रातील भ्रष्टाचाराला आळा घालावा : अध्यापक भारतीची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

Feb 3, 2022

शैक्षणिक क्षेत्रात शासन, प्रशासन पातळीवर अधिकारी लाजिरवाणी,किळसवाणी भ्रष्टाचार करत असून कर्मचारी नियुक्ती,वैयक्तिक मान्यता,शालार्थ आयडी,वेतन निश्चिती या व इतर सर्वच शैक्षणिक बाबी मान्यता मंजुरी संदर्भात सातत्याने भ्रष्टाचाराच्या अक्षम्य घटना पुढे येत आहे.सरकारने या संदर्भात गांभीर्याने लक्ष देऊन पारदर्शक धोरण व कायदे नियम अवलंबणे आवश्यक झाले आहे.शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी वैयक्तिक मान्यता,शालार्थ आयडी व वेतन निश्चिती आदी सर्व मान्यता ऑनलाईन करण्यात याव्यात व भ्रष्टाचारास विनाविलंब आळा घालावा तसा कायदा त्वरित करून सरकार व शिक्षण क्षेत्राची होत असलेली बदनामी थांबवावी अशी मागणी राष्ट्रीय बालक,विद्यार्थी, पालक,शिक्षक शिक्षण-प्रशिक्षण संस्था अध्यापकभारतीचे संस्थापक शरद शेजवळ यांनी मुख्यमंत्री,शिक्षणमंत्री यांना पाठवलेले निवेदनात करण्यात आली आहे.
अध्यक्ष प्रा.विनोद पानसरे,प्रा.के.एस.केवट, एस.एन.वाघ,सुभाष वाघेरा,प्रा.नुमान शेख,महेंद्र गायकवाड,वनिता सरोदे आदींच्या निवेदनावर साह्य आहेत.
शैक्षणिक क्षेत्रातील विविध प्रकारच्या मान्यता,मंजुऱ्या या बद्दल योग्य ती उचित कार्यवाही करून गेल्या अनेक दिवसांपासून आर्थिक मागणीच्या करणास्थाव शिक्षण विभागाकडे अडकलेल्या प्रस्ताव फाईल शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी वैयक्तिक मान्यता,शालार्थ आयडी व वेतन निश्चितीचे रखडलेली कामे त्या शिक्षक कर्मचाऱ्यांनचा संविधानिक हक्क-अधिकार म्हणून दप्तर दिरंगाई कायद्याचे पालन करून निकाली काढाव्यात असे स्पष्ट आदेश सूचना संबंधित खात्यातील अधिकारी कर्मचाऱ्यांना द्यावेत अशी मागणी सदर निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

अजून बातम्या वाचा..

महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षण मंत्री नामदार दादाजी भुसे व नांदगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुहास अण्णा कांदे यांचा भव्य नागरी सत्कार नाशिक स्वामीनारायण बँक्वेट हॉल येथे संपन्न झाला.

महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षण मंत्री नामदार दादाजी भुसे व नांदगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुहास अण्णा कांदे यांचा भव्य नागरी सत्कार नाशिक स्वामीनारायण बँक्वेट हॉल येथे संपन्न झाला.

याप्रसंगी मंचावर नाशिक जिल्ह्यातील शिवसेनेचे नेते पदाधिकारी शिवसैनिक उपस्थित होते. नागरी सत्कार...

read more
मनमाड क्रिकेट असोसिएशन तर्फे कार्यसम्राट आमदार मा.सुहासआण्णा कांदे साहेब यांचा सत्कार.

मनमाड क्रिकेट असोसिएशन तर्फे कार्यसम्राट आमदार मा.सुहासआण्णा कांदे साहेब यांचा सत्कार.

  मनमाड:-आपल्या नांदगाव तालुक्याचे लोकप्रिय,कार्यसम्राट, पाणीदार, क्रीडासम्राट दमदार आमदार...

read more
राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपजिल्हाध्यक्ष दत्तू पवार यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपजिल्हाध्यक्ष दत्तू पवार यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश

  नांदगाव - आमदार सुहास आण्णा कांदे यांच्या उपस्थितीत देवाज बंगलो नांदगाव येथे राष्ट्रवादी...

read more
नांदगाव तालुक्यात दोन अद्ययावत रुग्णवाहिकांचे आमदार कांदे यांच्या हस्ते लोकार्पण

नांदगाव तालुक्यात दोन अद्ययावत रुग्णवाहिकांचे आमदार कांदे यांच्या हस्ते लोकार्पण

नांदगाव आमदार सुहास अण्णा कांदे यांच्या प्रयत्नातून व हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड कंपनीच्या...

read more
.