शिवसेनेचे तालुका प्रमुख किरण देवरे यांची नांदगाव तालुका संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाली.
या योजनेसाठी आता अधिकृत रित्या निवड समितीची स्थापना झाली. सात वर्षापासून तालुकास्तरीय कुठल्याही शासकीय समित्या गठीत झालेल्या नव्हत्या त्यामुळे विविध योजनेच्या लाभासाठी अनेकांना वारंवार तहसील कार्यालयाचे उंबरे झिजावे लागत होते. महाआघाडी सत्तेत आल्यानंतर आता पुन्हा एकदा स्थानिक स्तरावरील समित्या गठीत होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. आमदार सुहास कांदे यांच्या शिफारशीनुसार नांदगाव तालुका संजय गांधी निराधार अनुदान योजनेसाठी स्थानिक स्तरावर लाभार्थी निवड समितीची स्थापना झाली असून शिवसेनेचे तालुकाप्रमुख किरण देवरे यांची अध्यक्षपदी नियुक्ती झाली. समितीवर शिवसेनेचा वरचष्मा असला तरी काँग्रेस व राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना सदस्य म्हणून संधी मिळाली आहे.
राज्यातील सुमारे २६५ तालुके दुष्काळग्रस्त जाहीर
पावसाळ्यातील यंदाच्या हंगामात सुरुवातीपासूनच मान्सूनने ओढ दिल्याने राज्यातील काही भागांसह नांदगाव...











