Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

मनमाड शहरात श्री गणेश जयंती भक्तिभावाने साजरी

Feb 4, 2022

मनमाड शहरातील श्री गणेश मंदिर आणि गणेश मंडळांकडून श्री गणेश जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.

मनमाड शहराचे आराध्य दैवत श्री निलमनी गणेश मंदिरामध्ये पहाटे अभिषेक पुजा ,दुपारी श्री सत्यविनायक पुजा आणि रात्री 8 वाजता महाआरती करून भाविकांना प्रसाद वाटप करण्यात आले . आय. यु. डी. पी. येथील श्री कमलाक्षय गणेश मंदीरामध्ये सकाळी अभिषेक पुजन ,दुपारी 12 वाजता महाआरती करून श्री गणेश जन्मोत्सव साजरा करण्यात आला.

दत्त मंदिर येथील श्री गणेश मंदीर येथे श्री गणेशाची अभिषेक पुजा करून महाप्रसाद वाटप करण्यात आला , खाकीबाग येथील धुम्रकेतु श्री गणेश मंदिरात देखील अभिषेकपुजन आणि प्रसाद वाटप करून श्री गणेश जयंती साजरी करण्यात आली.विवेकानंद नगर येथील सिद्धिविनायक गणेश मंदिरामध्ये महाअभिषेक , श्री गणेशयाग आणि मिरवणुक काढुन गणेशजयंती उत्सव साजरा करण्यात आला. श्री स्वामी समर्थ केंद्र येथे देखील श्री गणेश जयंतीनिमित्त श्री गणेशयागाचे आयोजन करण्यात आले होते.

शहरातील ओम विश्वरूप गणेश मंडळ आणि दोस्ती गणेश मंडळ यांच्या सह शहरातील अनेक गणेश मंडळाकडून श्री गणेशाचे पुजन , आरती आणि प्रसाद वाटप करून श्री गणेश जयंती साजरी करण्यात आली.

या सर्व ठिकाणी श्री गणेश जयंतीच्या कार्यक्रमांना शहरातील गणेशभक्त आणि भाविक हजर होते.

अजून बातम्या वाचा..

साहिल जाधव ने पटकावले सुवर्णपदक जयराज परदेशी ला रौप्यपदक अनिरुद्ध अडसुळे ला कांस्यपदक

साहिल जाधव ने पटकावले सुवर्णपदक जयराज परदेशी ला रौप्यपदक अनिरुद्ध अडसुळे ला कांस्यपदक

छत्रपती संभाजी नगर येथे संपन्न झालेल्या राज्यस्तरीय युथ ज्युनियर सीनियर वेटलिफ्टिंग स्पर्धेत...

read more
के आर टी हायस्कूलअँड ज्युनिअर कॉलेजमध्ये राष्ट्रीय क्रीडा दिन मेजर ध्यानचंद यांचा जन्मदिवस म्हणून साजरा करण्यात आला.

के आर टी हायस्कूलअँड ज्युनिअर कॉलेजमध्ये राष्ट्रीय क्रीडा दिन मेजर ध्यानचंद यांचा जन्मदिवस म्हणून साजरा करण्यात आला.

कार्यक्रमाचे आयोजन इयत्ता आठवी व इयत्ता तिसरीच्या विद्यार्थ्यांनी केले होते. त्यावेळेस शाळेचे...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]