सर्वसामान्यांच्या तक्रारी, अडचणींचा तात्काळ निपटारा करण्यासाठी नाशिकमध्ये सोमवारी, 7 फेब्रुवारी रोजी जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आले आहे. दुपारी 2.00 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय, मध्यवर्ती सभागृह येथे हा लोकशाही दिन होईल, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी भागवत डोईफोडे यांनी दिली आहे. जिल्हाधिकारी लोकशाही दिनासाठी जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक, जिल्हा पोलीस आयुक्तालय असल्यास अथवा पोलीस उपायुक्त दर्जाचा अधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच पाटबंधारे, बांधकाम, परिवहन, सहकार, कृषी विभागांचे जिल्हास्तरीय प्रमुख अधिकारी व जिल्हा पाणीपुरवठा समन्वय अधिकारी यांची उपस्थिती असते. त्यामुळे संबंधित तक्रारदाराच्या अडचणीचे तात्काळ निवारण होते. त्याला जलद न्याय मिळतो.
अनकवाडे शिवारात अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्या ठार…
मनमाड -येवला महामार्गावर अनकवाडे गावाजवळ वाहनाच्या धडकेत बिबट्या ठार झाल्याची घटना आज शनिवारी...











