Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

मनमाड – लासलगाव मार्गावर एका व्यक्तीचा धारदार हत्याराने खून

Feb 7, 2022

जनावरे खरेदी विक्री करणाऱ्या पिंपळगाव धाबळी येथील अनिल आहिरें (वय-32) नामक तरुणाचा येथील मनमाड लासलगाव रोड परिसरात धारदार शस्त्राचा वापर करून खून करण्यात आल्याची घटना घडली असून अनिलच्या डोक्यावर,पायावर आणि पोटावर धारदार हत्याराने वार करून त्याला ठार मारण्यात आले. रविवारी घरून निघतांना पिकावरील औषधे आणण्यासाठी जात असल्याचे सांगुन गेला होता मात्र रात्री परत आला नाही असे त्याच्या भावाने सांगितले. घटनेची माहिती मिळताच पोलिस उपाधिक्षक समीरसिंह साळवे,पोलिस निरीक्षक समीर बावरकर,सहाय्यक निरीक्षक प्रल्हाद गीते,गजानन राठोड,हरिश्चंद्र पाळवी,अशोक पवार,नरेश सौंदाने, उत्तम गोसावी,मुदस्सर शेख,गणेश नरवटे,संदीप झालटे, रणजित चव्हाण आदीनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.चांदवड पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला असून आरोपींना लवकरच जेरबंद केले जाईल असे पोलीस उपअधीक्षक समिरसिंग साळवे यांनी सांगितले.

अजून बातम्या वाचा..

(बघा व्हिडीओ) मनमाड -तिरुपती एक्सप्रेस रेल्वे प्रवासी गाडी /नांदेड – मुंबई पॅसेंजर गाडी सुरू करावी-नितीन पांडे

(बघा व्हिडीओ) मनमाड -तिरुपती एक्सप्रेस रेल्वे प्रवासी गाडी /नांदेड – मुंबई पॅसेंजर गाडी सुरू करावी-नितीन पांडे

मनमाड :भारतीय रेल्वे च्या दक्षिण - मध्य रेल्वे च्या सिकंदराबाद क्षेत्राची क्षेत्रीय रेल्वे...

read more
नागेश्वर चौकात श्री लक्ष्मीमाता मंदीराच्या सभामंडप व सुशोभीकरण कामाचे भूमिपूजन संपन्न

नागेश्वर चौकात श्री लक्ष्मीमाता मंदीराच्या सभामंडप व सुशोभीकरण कामाचे भूमिपूजन संपन्न

नांदगाव : आ सुहास कांदे यांच्या माध्यमातून तसेच सौ.अंजुम ताई कांदे यांच्या विशेष प्रयत्नाने...

read more
फलक रेखाटन – बैलपोळा

फलक रेखाटन – बैलपोळा

आपल्या भारतीय कृषिप्रधान संस्कृतीतील मुख्य घटक असणारा बैल हजारो वर्षापासून शेतकऱ्या सोबत शेतात...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]