Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

मनमाड – लासलगाव मार्गावर एका व्यक्तीचा धारदार हत्याराने खून

Feb 7, 2022

जनावरे खरेदी विक्री करणाऱ्या पिंपळगाव धाबळी येथील अनिल आहिरें (वय-32) नामक तरुणाचा येथील मनमाड लासलगाव रोड परिसरात धारदार शस्त्राचा वापर करून खून करण्यात आल्याची घटना घडली असून अनिलच्या डोक्यावर,पायावर आणि पोटावर धारदार हत्याराने वार करून त्याला ठार मारण्यात आले. रविवारी घरून निघतांना पिकावरील औषधे आणण्यासाठी जात असल्याचे सांगुन गेला होता मात्र रात्री परत आला नाही असे त्याच्या भावाने सांगितले. घटनेची माहिती मिळताच पोलिस उपाधिक्षक समीरसिंह साळवे,पोलिस निरीक्षक समीर बावरकर,सहाय्यक निरीक्षक प्रल्हाद गीते,गजानन राठोड,हरिश्चंद्र पाळवी,अशोक पवार,नरेश सौंदाने, उत्तम गोसावी,मुदस्सर शेख,गणेश नरवटे,संदीप झालटे, रणजित चव्हाण आदीनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.चांदवड पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला असून आरोपींना लवकरच जेरबंद केले जाईल असे पोलीस उपअधीक्षक समिरसिंग साळवे यांनी सांगितले.

अजून बातम्या वाचा..

रिपाई चे शहराध्यक्ष महावीर जाधव यांसह नागरिकांनी विविध प्रलंबित कामांसाठी केले लाक्षणिक उपोषण:प्रशासनाच्या लेखी आश्वासनानंतर घेतले मागे

रिपाई चे शहराध्यक्ष महावीर जाधव यांसह नागरिकांनी विविध प्रलंबित कामांसाठी केले लाक्षणिक उपोषण:प्रशासनाच्या लेखी आश्वासनानंतर घेतले मागे

नांदगाव शहरातील इंद्रायणी नगर / चांडकप्लॉट,जयभोले नगर येथील समस्यांच्या संदर्भात आज रिपाइंचे...

read more
पावसाळ्यात निवडणुका घेणे अडचणीचे : निवडणूक आयोगाचे कोर्टात स्पष्टीकरण ,राज्यातील रखडलेल्या निवडणुका होणार पावसाळ्यानंतरच?

पावसाळ्यात निवडणुका घेणे अडचणीचे : निवडणूक आयोगाचे कोर्टात स्पष्टीकरण ,राज्यातील रखडलेल्या निवडणुका होणार पावसाळ्यानंतरच?

कोरोना लाटेमुळे आणि त्यानंतर ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यातील रखडलेल्या स्थानिक स्वराज्य...

read more
ऑल इंडिया एससी एसटी रेल्वे एम्प्लाईज असोसिएशन कारखाना तर्फे बुद्ध पौर्णिमा निमित्त खिरदान कार्यक्रमाचे आयोजन

ऑल इंडिया एससी एसटी रेल्वे एम्प्लाईज असोसिएशन कारखाना तर्फे बुद्ध पौर्णिमा निमित्त खिरदान कार्यक्रमाचे आयोजन

ऑल इंडिया एससी एसटी रेल्वे एम्प्लाईज असोसिएशन कारखाना शाखा तर्फे बुद्ध पौर्णिमा निमित्त खिरदानाचा...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]