Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

मनमाड – लासलगाव मार्गावर एका व्यक्तीचा धारदार हत्याराने खून

Feb 7, 2022

जनावरे खरेदी विक्री करणाऱ्या पिंपळगाव धाबळी येथील अनिल आहिरें (वय-32) नामक तरुणाचा येथील मनमाड लासलगाव रोड परिसरात धारदार शस्त्राचा वापर करून खून करण्यात आल्याची घटना घडली असून अनिलच्या डोक्यावर,पायावर आणि पोटावर धारदार हत्याराने वार करून त्याला ठार मारण्यात आले. रविवारी घरून निघतांना पिकावरील औषधे आणण्यासाठी जात असल्याचे सांगुन गेला होता मात्र रात्री परत आला नाही असे त्याच्या भावाने सांगितले. घटनेची माहिती मिळताच पोलिस उपाधिक्षक समीरसिंह साळवे,पोलिस निरीक्षक समीर बावरकर,सहाय्यक निरीक्षक प्रल्हाद गीते,गजानन राठोड,हरिश्चंद्र पाळवी,अशोक पवार,नरेश सौंदाने, उत्तम गोसावी,मुदस्सर शेख,गणेश नरवटे,संदीप झालटे, रणजित चव्हाण आदीनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.चांदवड पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला असून आरोपींना लवकरच जेरबंद केले जाईल असे पोलीस उपअधीक्षक समिरसिंग साळवे यांनी सांगितले.

अजून बातम्या वाचा..

मनमाड महाविद्यालयात संगणक प्रशिक्षण कार्यशाळा व सोने विपणन क्षेत्रा संदर्भातील ग्राहकाची जाणीव जागृती कार्यक्रम संपन्न

मनमाड महाविद्यालयात संगणक प्रशिक्षण कार्यशाळा व सोने विपणन क्षेत्रा संदर्भातील ग्राहकाची जाणीव जागृती कार्यक्रम संपन्न

महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित,कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड, येथे वाणिज्य विभागात...

read more
पवार यांच्या निवासस्थानी झालेल्या हल्ल्याचा मनमाड शहर राष्ट्रवादी पक्षाने केला निषेध

पवार यांच्या निवासस्थानी झालेल्या हल्ल्याचा मनमाड शहर राष्ट्रवादी पक्षाने केला निषेध

राष्ट्रवादी पक्षाचे संस्थापक अध्यक्ष शरद पवार यांच्या मुंबई येथील निवासस्थानी झालेल्या हल्ल्याच्या...

read more
भाग क्र. 4 डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातील भोगवटदार वर्ग 2 उतारे मिळण्याकरीता प्रत्यक्ष मोजणीला सुरुवात

भाग क्र. 4 डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातील भोगवटदार वर्ग 2 उतारे मिळण्याकरीता प्रत्यक्ष मोजणीला सुरुवात

प्रभाग क्र. 4 डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक विभागातील शासकीय जागेवरील निवासी अतिक्रमण कायम करण्यासाठी...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]