Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

वेहेळगाव सब स्टेशन मध्ये अतिरिक्त फिडर चे उद्घाटन संपन्न

Feb 9, 2022

वेहेळगाव येथील वीज वितरण कंपनीचे 33/11kv चे विद्युत उपकेंद्रा मध्ये दोन फीडर नव्याने बसवण्यात आले असून या नवीन फिडरचे उदघाटन आमदार सुहासआण्णा कांदे यांच्या हस्ते करण्यात आले. वेहेळगाव सब स्टेशन मधून कमी दाबामुळे विद्युत पुरवठा होत असल्यामूळे सामान्य नागरिक व शेतकरी बांधवांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत होते. परिसरातील शेतकऱ्यांची होणारी गैरसोय व त्यांच्या तक्रारीची दखल घेऊन वीज वितरण कंपनीस अतिरिक्त फिडर बसून देण्याच्या सूचना केल्या होत्या. यानुसार वेहेळगाव सबस्टेशन मध्ये दोन अतिरिक्त फिडर बसविण्यात आले असून त्याचा शुभारंभ नारळ फोडून आज केला. नव्याने बसविण्यात आलेल्या फिडर मुळे वीज पुरवठा उच्च दाबाने मिळणार असून याचा फायदा वेहेळगाव, कळमदरी, आमोदे, बोराळे, जामदरी, तळवाडे या गावातील शेतकरी व नागरिकांना होणार असल्याने उपस्थित पंचक्रोशीतील नागरिकांनी आनंद व्यक्त केला. सोबत शिवसेना तालुकाप्रमुख किरणभाऊ देवरे, अमोलशेठ नावंदर वीज वितरण कंपनीचे उपअभियंता श्री. वाटपाडे साहेब व सहाय्यक अभियंता श्री. सोनटक्के साहेब आदी उपस्थित होते.

अजून बातम्या वाचा..

दोन लाखाची लाच स्वीकारताना वीज वितरण कंपनीच्या दोन अधिकाऱ्यांना एसीबी ने केली अटक

दोन लाखाची लाच स्वीकारताना वीज वितरण कंपनीच्या दोन अधिकाऱ्यांना एसीबी ने केली अटक

धुळे विभागांतर्गत महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी अंतर्गत केलेल्या वीज जोडणीचे बिल विना त्रुटी...

read more
जागतिक महिला दिनानिमित्त लायन्स क्लब ऑफ मनमाड सिटी तर्फे रविवारी महिलांसाठी सायकल स्पर्धा

जागतिक महिला दिनानिमित्त लायन्स क्लब ऑफ मनमाड सिटी तर्फे रविवारी महिलांसाठी सायकल स्पर्धा

जागतिक महिला दिनानिमित्त लायन्स क्लब ऑफ मनमाड सिटी तर्फे रविवार दिनांक 12 मार्च 2023 रोजी मुली व...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]