loader image
[ays_poll id=7]

कृषी आकस्मिक निधीतून तात्काळ वीजयंत्रणेची कामे करावीत: ऊर्जामंत्री डॉ नितीन राऊत

Feb 9, 2022



नाशिक जिल्ह्यातील वीजप्रश्नावर  ऊर्जामंत्री यांची लोकप्रतिनिधीसमवेत  बैठककृषिपंप वीज धोरण २०२०  अंतर्गत वीजबिलांच्या थकबाकीचा भरणा करीत  थकबाकीमध्ये तब्बल ६६ टक्क्यांपर्यंत सवलत मिळवित शेतकऱ्यांनी सहभाग नोंदविला असून  या भरलेल्या वीज बिलाच्या रकमेतून  नाशिक जिल्हा व  ग्रामपंचायत  क्षेत्रातील कृषी वीजयंत्रणेचे  विस्तारीकरण व सक्षमीकरण, रोहित्रांची क्षमतावाढ यासाठी योजनेतील  कृषी आकस्मिक निधीचा वापर करून  देखभाल व दुरुस्तीची कामे गतीने व तात्काळ करण्याचे निर्देश ऊर्जामंत्री डॉ.नितीन राऊत यांनी आज बुधवारी  दिले.

नाशिकचे पालकमंत्री ना. छगन भुजबळ  यांच्या उपस्थितीत व  पुढाकाराने  नाशिक जिल्ह्यातील वीज समस्यांवर आज मुंबई येथे  मंत्रालयात आयोजित बैठकीत ऊर्जामंत्री ना. राऊत बोलत होते. बैठकीला राज्याचे कृषिमंत्री दादासाहेब भुसे, केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार, जिल्ह्यातील मान्यवर विधानमंडळ सदस्य  आमदार सरोज आहिरे, सुहास कांदे, माणिकराव कोकाटे, दिलीपकाका बनकर, दिलीप बोरसे, नितीन पवार, हिरामण खोसकर, देवयानी फरांदे, राहुल ढिकले, किशोर दराडे आणि नरेंद्र दराडे,  उर्जा विभागाचे प्रधान सचिव दिनेश वाघमारे, जिल्हाधिकारी सुरज मांढरे, मराविम सुत्रधारी कंपनीचे सल्लागार उत्तम झाल्टे, महावितरणचे संचालक (संचलन) संजय ताकसांडे, नाशिक परिमंडळाचे मुख्य अभियंता दीपक कुमठेकर, अधीक्षक अभियंते ज्ञानदेव पडळकर व रमेश सानप इतर अधिकारी प्रत्यक्ष व  आभासी उपस्थित होते.
नाशिक  जिल्ह्यात नवीन कृषिपंप धोरणांतर्गत शेतकऱ्यांनी २६४ कोटी रुपयांचा भरणा केला असून यातील ८७ कोटी रुपये  ग्रामपंचायत स्तरावर व ८७ कोटी रुपये जिल्हा स्तरावर कृषी वीजयंत्रणेचे  विस्तारीकरण व सक्षमीकरण, रोहित्राची क्षमतावाढ यासाठी वापर करण्यात येणार आहे. नाशिक जिल्ह्यातील २लाख ७० हजार  कृषी ग्राहकांचे मोबाईल क्रमांक नोंदणी केले असून त्यांना वीज पुरवठा खंडित व महावितरण संबधी विविध  माहिती संदेशाद्वारे पाठविली जाते. मात्र यासोबतच  मोबाईल नोंदणी नसलेल्या ग्राहकांना विविध माध्यमातून तथा छापील नोटीस कृषी ग्राहकांना देण्याचे निर्देश त्यांनी दिले.

जिल्हा नियोजन व विकास समितीच्या माध्यमातून विद्युत  यंत्रणेच्या विकासासाठी व सक्षमीकरणासाठी  निधीचे नियोजन केले जाते मात्र यासाठी संपूर्ण निधी  मिळण्यास कालावधी लागत असतो, त्यामुळे संपूर्ण निधी मिळण्याची वाट न पाहता निधी समितीकडून मंजुरी आदेश मिळाल्यानंतर तात्काळ निविदा प्रकिया व प्राप्त निधीतून कामे तात्काळ सुरु करण्यात यावी, यामधील प्रणालीमध्ये  काही त्रुटी असेल तर वरिष्ठ कार्यालयाने  दूर करण्याचे  निर्देश त्यांनी  दिले. जिल्ह्यातील विधिमंडळ सदस्यांचा सामाजिक माध्यमावर समूह बनवून त्यावर जिल्ह्यातील विकास कामे, समस्यां व तक्रार निवारण संदर्भातील अद्ययावत माहिती या माध्यमातुन उपलब्ध करून देण्याचे निर्देश महावितरणच्या  अधिकाऱयांना दिले. 

पालकमंत्री ना. छगन भुजबळ,कृषिमंत्री दादासाहेब भुसे, केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार, जिल्ह्यातील मान्यवर विधानमंडळ सदस्य यांनी जिल्ह्यातील वीजेसंदर्भात सूचना ,अपेक्षा व तक्रारी बैठकीत मांडल्या यावेळी प्रत्येक समस्येवर मार्ग काढून त्याचे निवारण करण्यात येईल असे ऊर्जामंत्री डॉ. राऊत यांनी यावेळी सांगितले. विद्युत क्षेत्र चालविण्यासाठी व अखंडित वीजपुरवठा करण्यासाठी पैशांची आवश्यकता असते, वापरलेल्या विजेची देयके न भरल्यास वीज सेवा देणे शक्य होणार नसल्याचे सुद्धा त्यांनी यावेळी स्पष्ट केले. महावितरणच्या अभियंत्यांनी लोकप्रतिनिधी आणि ग्राहकांच्या  मोबाईलच्या माध्यमातून आलेला कॉल घेऊन उत्तरे द्यावी व  संपर्कात रहावे जे अधिकारी, अभियंते सौज्यनंशील सेवा देणार नाहीत त्यावर कारवाई करण्याचे सुद्धा यावेळी आदेश दिले. कृषी ग्राहकांच्या वीज देयकासंदर्भात तक्रार असेल तर त्यासाठी मोहीम राबवून चुकलेली बिले दुरुस्ती करून त्यांना देयके भरण्यास प्रोत्साहित करावे असे निर्देश डॉ राऊत यांनी यावेळी महावितरणला दिलेत.



अजून बातम्या वाचा..

नांदगाव-मनमाड मराठी पत्रकार संघाच्या वतीने स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या शहर पातळीवरील शालेय देशभक्तीपर समूह गीत गायन स्पर्धेला भरघोस प्रतिसाद

नांदगाव-मनमाड मराठी पत्रकार संघाच्या वतीने स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या शहर पातळीवरील शालेय देशभक्तीपर समूह गीत गायन स्पर्धेला भरघोस प्रतिसाद

मनमाड -- नांदगाव-मनमाड मराठी पत्रकार संघाच्या वतीने स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने आयोजित करण्यात...

read more
फलक रेखाटन – श्रीकृष्ण जन्माष्टमी व दहीहंडीच्या रंगीत खडू माध्यमातून मोरपंखी शुभेच्छा !

फलक रेखाटन – श्रीकृष्ण जन्माष्टमी व दहीहंडीच्या रंगीत खडू माध्यमातून मोरपंखी शुभेच्छा !

फलक रेखाटन - श्रीकृष्ण जन्माष्टमी व दहीहंडीच्या रंगीत खडू माध्यमातून मोरपंखी शुभेच्छा ! फलक रेखाटन...

read more
मनमाड शहर भाजप मंडलाच्या वतीने सलग 21व्या वर्षी अखंड भारत दिनी निमित्त व मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या जन्म दिना निमित्त आयोजित रक्तदान शिबीरात 30 रक्तदात्यांचे रक्तार्पण

मनमाड शहर भाजप मंडलाच्या वतीने सलग 21व्या वर्षी अखंड भारत दिनी निमित्त व मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या जन्म दिना निमित्त आयोजित रक्तदान शिबीरात 30 रक्तदात्यांचे रक्तार्पण

मनमाड - 79 व्या भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या पूर्व संध्ये ला 14 ऑगस्ट या अखंड भारत दिना निमित्ताने...

read more
व्यसनाधीन तरुण देशाच्या शाश्वत विकासासाठी धोक्याचे जागतिक युवा दिनानिमित्त मनमाड महाविद्यालयात, पोस्टर रांगोळी व पथनाट्य यांचे सादरीकरण

व्यसनाधीन तरुण देशाच्या शाश्वत विकासासाठी धोक्याचे जागतिक युवा दिनानिमित्त मनमाड महाविद्यालयात, पोस्टर रांगोळी व पथनाट्य यांचे सादरीकरण

महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाच्या रेड रिबन क्लब, राष्ट्रीय...

read more
श्रावण मास अंगारक (मंगळी ) संकष्ट चतुर्थी निमित्त मंगळवार दिनांक 12/08/2025 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात विशेष धार्मिक कार्यक्रमा चे आयोजन

श्रावण मास अंगारक (मंगळी ) संकष्ट चतुर्थी निमित्त मंगळवार दिनांक 12/08/2025 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात विशेष धार्मिक कार्यक्रमा चे आयोजन

मनमाड - शहराचे आराध्य दैवत आणि नवसाला पावणार गणपती म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध असणाऱ्या वेशीतील...

read more
.