Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

मनमाड महाविद्यालयात पुणे विद्यापीठ स्थापना दिन साजरा

Feb 10, 2022

मनमाड :-महात्मा गांधी विद्यामंदिर संचालित कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय मनमाड येथे महाविद्यालयातील क्रीडा विभाग, राष्ट्रीय सेवा योजना व राष्ट्रीय छात्र सेना यांच्या संयुक्त विद्यमाने प्राचार्य डॉ.ए. व्ही. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा 73 वा वर्धापन दिन ज्येष्ठ प्रा. डॉ. विलास थोरात यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करून साजरा करण्यात आला.
याप्रसंगी प्राचार्य डॉ.ए.व्ही पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त करताना पुणे विद्यापीठ स्थापनेपासून ते आजपर्यंत विद्यापीठाचा लेखाजोखा मांडला व सर्व विद्यार्थ्यांना हार्दिक शुभेच्छा दिल्या प्रा. डॉ. विलास थोरात यांनी महाविद्यालयात 1991साली राष्ट्रीय छात्र सेना विभागाची स्थापना झाली तेव्हा पासून पुढील सलग 25 वर्ष त्यानी केलेल्या कामाचा अनुभव कथन करुन राष्ट्रीय छात्र सेना विभागातील उत्कृष्ट कामगिरी केलेल्या एक छात्र आणि एक छात्रा आशा दोन विद्यार्थ्यांचा दरवर्षी सन्मान व्हावा यासाठी स्मृतिचिन्ह व रोख बक्षिस देण्यासाठी पन्नास हजार रुपये देणगी जाहीर केली.
याप्रसंगी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ.पी.जी.आंबेकर, वरिष्ठ पर्यवेक्षक डॉ.सतीश तांबे, प्राध्यापक वृंद व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन करताना कोरोनाविषयक नियमाचे पालन करण्यात आले.

अजून बातम्या वाचा..

स्वामी विवेकानंद व्याख्यानमालेस आज पासुन प्रारंभ….प्रथम पुष्प : श्री विवेक घळसासी

स्वामी विवेकानंद व्याख्यानमालेस आज पासुन प्रारंभ….
प्रथम पुष्प : श्री विवेक घळसासी

मनमाड : संस्कृती संवर्धन समिती आयोजित रौप्य महोत्सवी वर्ष यशस्वीपणे पूर्ण करणारी महाराष्ट्रातील एक...

read more

निवडणुका असलेल्या पाच राज्यांमध्ये लसीकरण प्रमाणपत्रावरून हटणार मोदींचे छायाचित्र !

पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम गत आठवड्यात निवडणूक आयोगाने जाहीर करून शनिवार पासून...

read more

शिवसंस्कार बहुउद्देशिय संस्थेद्वारे दर्पणपत्र दिनानिमित्त केला पत्रकारांचा सन्मान

नांदगाव येथील सामाजिक, शैक्षणिक, पर्यावरण संवर्धन करण्यासाठी सतत क्रियाशील असणारी संस्था म्हणजे...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]