Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

आमदार कांदे यांच्या पाठपुराव्याला यश – तालुक्यात सहा पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांची नियुक्ती

Feb 11, 2022


आमदार सुहास अण्णा कांदे यांच्या पाठपुराव्यामुळे नांदगाव तालुक्यात गेल्या अनेक दिवसांपासून करीत असलेली पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांची जागा भरून काढण्यात आली आहे. एकूण दहा जागा रिक्त होत्या त्यापैकी सहा जागांवर नियुक्ती करण्यात आली असून लवकरच उर्वरित चार जागांवर पशुवैद्यकीय अधिकारी यांची नियुक्ती करण्यात येणार आहे.
नांदगाव तालुक्यात अनेक वर्षांपासून पशुवैद्यकीय अधिकाऱ्याची 10 म्हणजे सर्वच्या सर्व पदे रिक्त होते. नांदगाव तालुक्यात एकही पशुवैद्यकीय अधिकारी उपलब्ध नसल्यामुळे शेतकऱ्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना भावी अनेक शेतकऱ्यांची जनावरे विविध आजारांना बळी पडून मृत्युमुखी पडले त्यामुळे शेतकऱ्यांना आपले पशुधन गमवावे लागले कधी अस्मानी तर सुलतानी संकटांमुळे आर्थिक विवंचनेत अडकलेल्या शेतकऱ्यांसमोर पशु वैद्यकीय अधिकाऱ्यांना भावी पशुधन वाचविण्याचे संकट उभे ठाकले होते. ही बाब आमदार सुहास अण्णा कांदे यांच्या लक्षात येताच त्यांनी लेखी पत्र तसेच अधिवेशना दरम्यान सभागृहामध्ये तारांकित प्रश्न उपस्थित करून नांदगाव मतदारसंघांमध्ये पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात यावी यासाठी वारंवार पाठपुरावा व प्रयत्न केले आमदारांच्या प्रयत्नांना यश येऊन नांदगाव तालुक्यात रिक्त असलेल्या दहापैकी श्रीमती ज्ञानदा जाधव भौरि, उदय बागल न्यायडोंगरी, श्री अनिल देवकर हिसवळ, श्रीमती दिपाली ठोसे मनमाड, श्री संतोष लोंढे वाखारी, श्रीमती दृष्टी भोसले पिंपरखेड अशा श्रेणी 1 च्या सहा अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा व जिव्हाळ्याचा प्रश्न असल्याने शेतकरी वर्गातून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. उर्वरित चार अधिकाऱ्यांचीही लवकरच नेमणूक करण्यात येईल असेही आमदार सुहास आण्णा कांदे यांनी सांगितले.

अजून बातम्या वाचा..

शेतकरी,राजकीय, सहकार चळवळीतील , योगदानाबद्दल स्वातंत्र्य सैनिक कॉ. माधवराव गायकवाड जीवनगौरव पुरस्कार 2025 मा. ज्येष्ठ साम्यवादी नेते भाई जयंत पाटील यांना जाहिर

शेतकरी,राजकीय, सहकार चळवळीतील , योगदानाबद्दल स्वातंत्र्य सैनिक कॉ. माधवराव गायकवाड जीवनगौरव पुरस्कार 2025 मा. ज्येष्ठ साम्यवादी नेते भाई जयंत पाटील यांना जाहिर

. शेतकरी,राजकीय, सहकार चळवळीतील , योगदानाबद्दल स्वातंत्र्य सैनिक कॉ. माधवराव गायकवाड जीवनगौरव...

read more
माध्यमिक शिक्षक सहकारी पतपेढी मर्यादित,मनमाड चेअरमनपदी रामकृष्ण नागरे व व्हाइस चेअरमनपदी चेतन सुतार सर यांची निवड.

माध्यमिक शिक्षक सहकारी पतपेढी मर्यादित,मनमाड चेअरमनपदी रामकृष्ण नागरे व व्हाइस चेअरमनपदी चेतन सुतार सर यांची निवड.

  मनमाड:- मनमाड माध्यमिक शिक्षक सहकारी पतपेढी मर्यादित,मनमाड च्या चेअरमनपदी श्री.रामकृष्ण...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]