मनमाड येथील के.आर.टी. शाळेत मातृ पितृ पूजन दिन साजरा करण्यात आला.प्राचार्य मुकेश मिसर यांनी पालकांना मार्गदर्शन तर सौ.राजश्री बनकर यांनी मातृ पितृ पूजन दिनाला अनुसरून कविता सादर केली. आई मांगल्य असते तर वडील घराचे अस्तित्व. कौसल्येचे कौतुक करावे पण पुत्र वियोगाने तडफडून मरण पावला तो राजा दशरथ लक्षात ठेवावा असे प्रतिपादन केले.विद्यार्थ्यांनी उपस्थित पालकांचे औक्षण करून गुलाबपुष्प दिले. मुख्याध्यपक दीपक व्यव्हारे,वैभव कुलकर्णी,धनंजय निंभोरकर आदी उपस्थित होते.अनिता शकाद्वीपी,गायत्री मिश्रा,ज्योती क्षीरसागर,शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.पालकांचा या कार्यक्रमाला उदंड प्रतिसाद लाभला
फलक रेखाटनातून भावपूर्ण श्रद्धांजली…! ‘अर्थव्यवस्थेचा ‘सरदार’ हरपला..!’
जेष्ठ अर्थतज्ञ ,आर्थिक सुधारणेचे जनक,शांतपणाचे अ 'सरदार' नेतृत्व. माजी पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंग...











