Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

वेटलीफ्टींग – राष्ट्रीय प्रशिक्षण शिबिरासाठी निवड झालेल्या प्रशिक्षक आणि खेळाडूंचा शिवसेनेतर्फे सत्कार

Feb 16, 2022

भारतीय क्रीडा प्राधिकरण आयोजित राष्ट्रीय प्रशिक्षण शिबिरासाठी जय भवानी व्यायाम शाळेची माजी खेळाडू व सध्या औरंगाबाद साई येथे प्रशिक्षक असलेली तृप्ती शेखर पाराशर हिची राष्ट्रीय प्रशिक्षण शिबिरासाठी सहाय्यक प्रशिक्षक म्हणून नेमणूक करण्यात आली असून मनमाड शहरातील व नाशिक जिल्हा तसेच महाराष्ट्रातील पहिलीच प्रशिक्षक ठरली आहे.
राष्ट्रीय प्रशिक्षण शिबिरासाठी जय भवानी व्यायामशाळा व गुरू गोविंद सिंग हायस्कुलची विद्यार्थीनी आकांक्षा किशोर व्यवहारे हिची सलग दुसऱ्यांदा राष्ट्रीय प्रशिक्षण शिबिरासाठी निवड करण्यात आली आहे.
यशस्वी खेळाडू प्रशिक्षक यांना छत्रे विद्यालयाचे क्रीडा प्रशिक्षक प्रवीण व्यवहारे यांचे मार्गदर्शन लाभले आहे, व तसेच निवड झालेले साई सेंटर (औरंगाबाद ) येथील 5 खेळाडू यांना NIS कोच तृप्ती पाराशर यांनी प्रशिक्षण दिले. हे खेळाडू पतियाळा येथे प्रशिक्षण शिबिरासाठी जाताना मनमाड येथे आले असतांना शिवसेना संपर्क कार्यालयात मनमाड शहर शिवसेनेच्या वतीने त्या सर्व खेळाडू व प्रशिक्षक यांचा सत्कार करून त्यांच्या होणाऱ्या स्पर्धेसाठी विजयी शुभेच्छा देण्यात आल्या. याप्रसंगी शिवसेना शहरप्रमुख मयुर बोरसे, जि.संघटक राजाभाऊ भाबड, जि. समन्वयक भाऊ पाटील,मुन्नाभाऊ दरगुडे, सुनिल हांडगे, योगेश , सचिन दरगुडे, छोटू राऊत, आशिष पराशर, दीपक मौर्य, ई. शिवसैनिक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ठोंबरे सर यांनी केले.

अजून बातम्या वाचा..

मनमाड सार्वजनिक वाचनालयास “रांगोळी कलात्मक सौंदर्याचा वेध ” हा दुर्मिळ ग्रंथ भेट

मनमाड सार्वजनिक वाचनालयास “रांगोळी कलात्मक सौंदर्याचा वेध ” हा दुर्मिळ ग्रंथ भेट

मनमाड - धार्मिक /सामाजिक कार्यात अथवा कोणत्याही शुभ कार्यात प्रसन्नता येणे साठी रांगोळी काढण्यात...

read more
नांदगाव तालुकास्तरीय कराटे स्पर्धेत मनमाड कनिष्ठ महाविद्यालयातील खेळाडू विजयी

नांदगाव तालुकास्तरीय कराटे स्पर्धेत मनमाड कनिष्ठ महाविद्यालयातील खेळाडू विजयी

मनमाड : शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, क्रीडा व युवक सेवा संचलनालय पुणे आयोजित जिल्हा क्रीडा अधिकारी...

read more
मनमाड महाविद्यालयाचे श्री विठ्ठल सातपुते शिक्षणशास्त्र विषयात सेट परीक्षा उत्तीर्ण

मनमाड महाविद्यालयाचे श्री विठ्ठल सातपुते शिक्षणशास्त्र विषयात सेट परीक्षा उत्तीर्ण

मनमाड : येथील महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित, कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड येथील...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]