Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

आनंद धर्मार्थ दवाखान्याच्या वर्धापन दिनानिमित्त राहत फौंडेशनतर्फे अभिष्टचिंतन

Feb 16, 2022

श्री सुशील अमृत जैन महिला मंडळ संचालित श्री आनंद धर्मार्थ दवाखान्याच्या वर्धापनदिनानिमित्त दवाखान्यात अत्यंत वाजवी फी मध्ये सेवा देणाऱ्या डॉक्टर्सचा सम्मान करण्यात आला.मागील 5 वर्षांपासून मनमाड शहरातील श्री सुशील अमृत जैन महिला मंडळ संचलित श्री आनंद धर्मार्थ दवाखान्यात अत्यंत वाजवी दरात रुग्णसेवा निरंतर सुरू असून टकार मोहल्ला,राजवाडा,इदगाह झोपडपट्टी,डॉ. आंबेडकर चौक येथील गोरगरीब नागरिकांना यामुळे दिलासा मिळाला आहे. या दवाखान्यात सेवा देणाऱ्या डॉक्टरांनी आपल्या जिवाची,परिवाराची पर्वा न करता कोरोना व्हायरस सारख्या जागतिक महामारीतही श्री आनंद धर्मार्थ दवाखान्यात रुग्णसेवा सुरूच ठेवली. त्यांनी मनमाड शहरासाठी दिलेल्या योगदानाबद्दल राहत फौंडेशन तर्फे सर्व डॉक्टरांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.यावेळेस डॉ. सुनील बागरेचा,डॉ. विकास चोरडिया, डॉ. मुथा, प्रथितयश उद्योगपती दिपकभाऊ मुनोत, मा. नगरसेवक नाजीमभाई शेख, कयाम सैय्यद, अनुप बेदमुथा,मुराद शेख, जाहिद शेख, वाहिद शेख व ईतर उपस्थित होते

 

अजून बातम्या वाचा..

प्रकाशा(शहादा) येथील सराफी दुकानातून सोन्याची पोत चोरणाऱ्या लासलगावच्या महिलेला मुद्देमालासह शिताफीने अटक

प्रकाशा(शहादा) येथील सराफी दुकानातून सोन्याची पोत चोरणाऱ्या लासलगावच्या महिलेला मुद्देमालासह शिताफीने अटक

सराफ दुकानात गर्दीचा फायदा घेऊन सोन्याच्या दागिन्यांची चोरी करणाऱ्या लासलगाव येथील महिलेला...

read more
ओबीसींच्या मागण्यांसाठी महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेचे मा.बांठिया आयोगाला निवेदन

ओबीसींच्या मागण्यांसाठी महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेचे मा.बांठिया आयोगाला निवेदन

सर्वोच्च न्यायालयाने ओबीसींचे आरक्षण रद्द केले आहे. त्याविरुद्ध सरकारने इमपेरिकल डेटा दाखल करावा,...

read more
विज बिले वेळेत भरून सहकार्य करा अन्यथा वीज पुरवठा खंडित करा ; सहव्यवस्थापकीय संचालक चंद्रकांत डांगे ह्यांचे निर्देश

विज बिले वेळेत भरून सहकार्य करा अन्यथा वीज पुरवठा खंडित करा ; सहव्यवस्थापकीय संचालक चंद्रकांत डांगे ह्यांचे निर्देश

राज्यभरात ग्राहकांना अखंडित वीजसेवा देणाऱ्या महावितरणची आर्थिक घडी विस्कटल्याने व अन्य कोणताही...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]