Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

आनंद धर्मार्थ दवाखान्याच्या वर्धापन दिनानिमित्त राहत फौंडेशनतर्फे अभिष्टचिंतन

Feb 16, 2022

श्री सुशील अमृत जैन महिला मंडळ संचालित श्री आनंद धर्मार्थ दवाखान्याच्या वर्धापनदिनानिमित्त दवाखान्यात अत्यंत वाजवी फी मध्ये सेवा देणाऱ्या डॉक्टर्सचा सम्मान करण्यात आला.मागील 5 वर्षांपासून मनमाड शहरातील श्री सुशील अमृत जैन महिला मंडळ संचलित श्री आनंद धर्मार्थ दवाखान्यात अत्यंत वाजवी दरात रुग्णसेवा निरंतर सुरू असून टकार मोहल्ला,राजवाडा,इदगाह झोपडपट्टी,डॉ. आंबेडकर चौक येथील गोरगरीब नागरिकांना यामुळे दिलासा मिळाला आहे. या दवाखान्यात सेवा देणाऱ्या डॉक्टरांनी आपल्या जिवाची,परिवाराची पर्वा न करता कोरोना व्हायरस सारख्या जागतिक महामारीतही श्री आनंद धर्मार्थ दवाखान्यात रुग्णसेवा सुरूच ठेवली. त्यांनी मनमाड शहरासाठी दिलेल्या योगदानाबद्दल राहत फौंडेशन तर्फे सर्व डॉक्टरांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.यावेळेस डॉ. सुनील बागरेचा,डॉ. विकास चोरडिया, डॉ. मुथा, प्रथितयश उद्योगपती दिपकभाऊ मुनोत, मा. नगरसेवक नाजीमभाई शेख, कयाम सैय्यद, अनुप बेदमुथा,मुराद शेख, जाहिद शेख, वाहिद शेख व ईतर उपस्थित होते

 

अजून बातम्या वाचा..

शिवस्फुर्ती जिर्णोद्धार सोहळ्यात बहुसंख्येने सहभागी रहावे मराठा महासंघाचे जाहीर आवाहन.!

शिवस्फुर्ती जिर्णोद्धार सोहळ्यात बहुसंख्येने सहभागी रहावे मराठा महासंघाचे जाहीर आवाहन.!

महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचे तेरावे वंशज आणि राजर्षी शाहू महाराजांच्या...

read more
वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर येवला शहरात पोलिसांकडून कोम्बिंग ऑपरेशन 2 तलवारी जप्त

वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर येवला शहरात पोलिसांकडून कोम्बिंग ऑपरेशन 2 तलवारी जप्त

दिनांक 11 मार्च रोजी सायंकाळी सात वाजता नाशिक जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक सचिन पाटील यांच्या...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]