Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

आनंद धर्मार्थ दवाखान्याच्या वर्धापन दिनानिमित्त राहत फौंडेशनतर्फे अभिष्टचिंतन

Feb 16, 2022

श्री सुशील अमृत जैन महिला मंडळ संचालित श्री आनंद धर्मार्थ दवाखान्याच्या वर्धापनदिनानिमित्त दवाखान्यात अत्यंत वाजवी फी मध्ये सेवा देणाऱ्या डॉक्टर्सचा सम्मान करण्यात आला.मागील 5 वर्षांपासून मनमाड शहरातील श्री सुशील अमृत जैन महिला मंडळ संचलित श्री आनंद धर्मार्थ दवाखान्यात अत्यंत वाजवी दरात रुग्णसेवा निरंतर सुरू असून टकार मोहल्ला,राजवाडा,इदगाह झोपडपट्टी,डॉ. आंबेडकर चौक येथील गोरगरीब नागरिकांना यामुळे दिलासा मिळाला आहे. या दवाखान्यात सेवा देणाऱ्या डॉक्टरांनी आपल्या जिवाची,परिवाराची पर्वा न करता कोरोना व्हायरस सारख्या जागतिक महामारीतही श्री आनंद धर्मार्थ दवाखान्यात रुग्णसेवा सुरूच ठेवली. त्यांनी मनमाड शहरासाठी दिलेल्या योगदानाबद्दल राहत फौंडेशन तर्फे सर्व डॉक्टरांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.यावेळेस डॉ. सुनील बागरेचा,डॉ. विकास चोरडिया, डॉ. मुथा, प्रथितयश उद्योगपती दिपकभाऊ मुनोत, मा. नगरसेवक नाजीमभाई शेख, कयाम सैय्यद, अनुप बेदमुथा,मुराद शेख, जाहिद शेख, वाहिद शेख व ईतर उपस्थित होते

 

अजून बातम्या वाचा..

आमदार सुहास आण्णा कांदे यांची व्यापारीबांधव तसेच मनमाडकरांना दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी व्यापारी पेठेतून पायी फेरी…

कोरोनाच्या बिकट परिस्थिती नंतर आता जनजीवन हळूहळू पूर्वपदावर येत असताना दिवाळी सणानिमित्त व्यापारी...

read more

पंचशील वाचनालयामध्ये स्पर्धा परीक्षांच्या पुस्तकांचा आढावा घेण्यासाठी जिल्हा नियोजन अधिकाऱ्यांची भेट!

   मनमाड :- येथील हुडको विभागात असलेल्या पंचशील सार्व. वाचनालामध्ये  मागील वर्षी महाराष्ट्र...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]