loader image
[ays_poll id=7]

राशिभविष्य : १७ फेब्रुवारी २०२२ !

Feb 17, 2022


मेष:- तुमचे व्यक्तिमत्व खुलून येईल. भावंडांशी खेळीमेळीचे वातावरण राहील. दीर्घकालीन गुंतवणुकीवर भर द्यावा. विरोधकांपासून  सावध राहावे. मुलांची प्रगती होताना दिसेल.

वृषभ:- सहकार्‍यांशी असणारा वाद संपुष्टात येईल. मित्रपरिवाराची अपेक्षित मदत मिळेल. कलाकार मंडळींची प्रगती होईल. बौद्धिक कामे करणार्‍यांना चांगली संधि मिळेल. महत्त्वाची कामे यशस्वी होतील.

मिथुन:- राजकारणापासून दूर राहावे. नोकरी निमित्त प्रवास करावा लागेल. वाहन जपून चालवावे. क्षुल्लक कारणांवरून रूसवे फुगवे संभवतात. नसते साहस करू नका.

कर्क:- कलाकारांचे मनोरथ पूर्ण होईल. सहकुटुंब तीर्थयात्रेचा योग येईल. मुलांच्या शुभ वार्तेने कान सुखावतील. आनंदाच्या भरात हुरळून जाऊ नका. जोडीदाराला अचानक लाभ संभवतो.

सिंह:- कामानिमित्त बराच प्रवास करावा लागेल. पैशाचा अपव्यय होणार नाही ह्याची काळजी घ्यावी. घरासाठी नवीन वस्तू खरेदी कराल. पर्यटनाचा विचार मनात येईल. घराचे सुशोभीकरण काढाल.

कन्या:- पदोन्नतीचे योग संभवतात. आर्थिक गरज पूर्ण होईल. कोणतेही गोष्ट अती करू नये. तुमच्या मताला प्राधान्य दिले जाईल. आलेल्या संधीचे सोने करावे.

तूळ:- सांस्कृतिक कामात सहभाग घ्याल. मुलांना उल्लेखनीय प्रशस्तिपत्रक मिळेल. कोणत्याही गोष्टीच्या जास्त खोलात जाऊ नका. जोडीदाराचे मत तुम्हाला पटणार नाही. बेफिकिरपणे वागू नका.

वृश्चिक:- तुमच्यातील कलागुणांची वाढ होईल. प्रेमप्रकरणात सावधानता बाळगा. योगायोगाची खात्री करावी. तुमचा  अंदाज अचूक ठरेल. मौज मजेकडे कल राहील.

धनू:- वाहन विषयक कामे निघतील. चैनीच्या वस्तु खरेदी कराल. व्यवसायिक ठिकाणी मन लावून काम करावे. कौटुंबिक सुख-शांती जपावी. अनिष्टता टाळण्याचा प्रयत्न करावा.

मकर:- आर्थिक कोंडी सोडवावी लागेल. व्यवसायिकांनी सजगता दाखवावी. वारसाहक्काच्या कामांतून लाभ संभवतो. कागदपत्रांवर विचारपूर्वक सह्या कराव्यात. कौटुंबिक ताणतणाव कमी करण्याचा प्रयत्न करावा.

कुंभ:- प्रकृतीची हेळसांड करू नये. जोडीदाराचे वर्चस्व राहील. मेहनतीत कसूर करू नका. वेळेचे मोल लक्षात घ्यावे. सामाजिक सेवेत पुढाकार घ्याल.

मीन :- चांगला आर्थिक लाभ होईल. मोहापासून दूर राहण्याचा प्रयत्न करावा. मित्रपरिवारात वाढ होईल. कोणावरही विसंबून राहू नका. मुलांची काळजी लागून राहील.


अजून बातम्या वाचा..

बघा व्हिडिओ-युनियन बँक घोटाळ्यातील प्रमुख आरोपी संदीप देशमुखला पोलिसांनी चाळीसगाव येथून घेतले ताब्यात – खातेदारांची बँकेच्या आवारात उसळली एकच गर्दी

बघा व्हिडिओ-युनियन बँक घोटाळ्यातील प्रमुख आरोपी संदीप देशमुखला पोलिसांनी चाळीसगाव येथून घेतले ताब्यात – खातेदारांची बँकेच्या आवारात उसळली एकच गर्दी

मनमाड शहरातील युनियन बँकेच्या शहर शाखेत झालेल्या मुदत ठेवी घोटाळा प्रकरणात आरोपी संदीप देशमुख याला...

read more
बघा व्हिडिओ – पायलट च्या हुशारी मुळे केदारनाथ च्या सात यात्रेकरूंचे वाचले प्राण

बघा व्हिडिओ – पायलट च्या हुशारी मुळे केदारनाथ च्या सात यात्रेकरूंचे वाचले प्राण

सध्या केदारनाथ यात्रा सुरू असून लाखो भाविक या यात्रेला जात असतात. केदारनाथ येथे यात्रेदरम्यान सात...

read more
बघा व्हिडिओ-नांदगाव – ४० गाव रोडवर गॅस सिलेंडर वाहतूक करणाऱ्या कंटेनरचा अपघात – चालक जखमी

बघा व्हिडिओ-नांदगाव – ४० गाव रोडवर गॅस सिलेंडर वाहतूक करणाऱ्या कंटेनरचा अपघात – चालक जखमी

नांदगांव : मारुती जगधने भरधाव वेगाने वाहन चालवल्यामुळे अपघात होण्याची शक्यता खूप वाढते. त्यात काही...

read more
.