Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

नेमिनाथ जैन संचलित तंत्रनिकेतनमध्ये डॉ.राजेंद्र ताथेड यांचे इफेक्टीव टिचिंग या विषयावर तीन दिवसीय कार्यशाळेचे आयोजन

Feb 17, 2022

नेमिनाथ जैन संचलित श्री एच एच जे बी तंत्रनिकेतनमध्ये दि. ११/०२/२०२२ ते १३/०२/२०२२  इफेक्टीव टिचिंग या विषयावर तीन दिवसीय कार्यशाळेचे आयोजन सर्व शिक्षक वर्गासाठी  करण्यात आले. या तीन दिवसीय कार्यशाळेत एस.एन.जे.बी. आश्रम, चांदवडचे टेक्नीकल डायरेक्टर, डॉ.राजेंद्र ताथेड  यांनी  रोल ऑफ टिचर , इफेक्टीव टिचिंग व  इफिसेंट टिचिंग  यामधील फरक, How to apply Engineering in day to day life  या विषयावर  मार्गदर्शन केले.तसेच Teaching Skill & communication Skill यावर भर देऊन सर्वाना समजेल अशा भाषेत त्यांनी आपले विचार मांडले.       या तीन दिवसीय कार्यशाळेचे आयोजन  तंत्रनिकेतनचे प्राचार्य डॉ. व्ही. ए. वानखेडे यांच्या मार्गदर्शनाखाली कॉम्प्युटर विभागामार्फत करण्यात आले. कॉम्प्युटर विभागाच्या अधिव्याख्याता शितल गोसावी ह्यांनी ह्या  कार्यशाळेचे आयोजन व  संचालन केले.या तीन दिवसीय कार्यशाळेच्या दि. १३/०२/२०२२ रोजी  समारोप करण्यात आला. त्याप्रसंगी मेकॅनिकल विभागाचे विभागप्रमुख श्री डी.व्ही.लोहार यांनी डॉ.राजेंद्र ताथेड  व उपस्थित सर्वांचे आभार मानून सुयश चिंतिले. विश्वस्त  समितीचे  अध्यक्ष मा.श्री बेबीलालजी संचेती व विश्वस्त  समितीचे उपाध्यक्ष  मा. श्री दिनेशजी लोढा, मानद सचिव मा.श्री  जवाहरलालजी  आबड,  प्रबंध  समितीचे  अध्यक्ष मा.श्री अजीतकुमारजी सुराणा,  प्रबंध समितीचे उपाध्यक्ष आणि तंत्रनिकेतनाचे  समन्वयक श्री अरविंदकुमारजी भन्साळी, सह मानद सचिव मा.श्री. झुंबरलालजी भंडारी व तंत्रनिकेतनाचे मुख्य  समन्वयक तथा प्रबंध समिती सदस्य, श्री राजेद्रकुमारजी बंब  यांनी या तीन दिवसीय कार्यशाळेच्या आयोजनाबद्दल सर्वांचे अभिनंदन केले व  शुभेच्छा देऊन समाधान व्यक्त केले . 

 

अजून बातम्या वाचा..

आमदार आपल्या दारी महशिबिराची मनमाड शहरात सुरुवात – नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

आमदार आपल्या दारी महशिबिराची मनमाड शहरात सुरुवात – नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

आमदार सुहास आण्णा कांदे यांच्या स्वखर्चातून आमदार आपल्या दारी या महाशिबिराची सुरुवात आजपासून मनमाड...

read more
मनमाड येथील एफ सी आय गोदामाची सुरक्षा यंत्रणा वाऱ्यावर – चोरट्यांनी केली ५५ तांदुळाची पोती लंपास

मनमाड येथील एफ सी आय गोदामाची सुरक्षा यंत्रणा वाऱ्यावर – चोरट्यांनी केली ५५ तांदुळाची पोती लंपास

मनमाड येथील भारतीय खाद्य निगमच्या गोडाऊनमधून ५५ पोती तांदुळाची चोरी झाल्याची घटना समोर आली आहे....

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]