मनमाड शहरातील सराफ व्यापारी अरुण पंडितराव सोनवणे यांची मुलगी सौ.आरती हीचा विवाह दीड महिन्यांपूर्वी वैजापूर येथील गौरव नागनाथ दाभाडे, बन्सीलाल नगर यांचेबरोबर शिर्डी येथे हॉटेल रीवा येथे संपन्न झाला होता. विवाहानंतर लगेच सासरच्या लोकांनी तिचा हुंड्यासाठी व सोन्यासाठी अतोनात शारीरिक व मानसिक छळ केला व आपसात संगनमत करत दिनांक १२/०२/२०२२ रोजी सौ. आरती हीचा खून केला व गुन्हा उघडकीस येऊ नये म्हणून पुरावे नष्ट केले आहेत व आरतीने आत्महत्या केल्याचा खोटा बनाव केला आहे.आरतीचे सासरे,सासू, नवरा व दीर यांनी हुंड्याच्या रकमेसाठी आणि सोन्यासाठी आरतीचा छळ करून तिला जिवे मारले असल्याचा या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
सदर घटनेतील आरोपींना कायद्यानुसार कडक शासन व्हावे व त्यांच्या विरुद्ध भा. द. वि.कलम ३०२,३०४ब,४९८ अ,२०१ व ३४ नुसार कारवाई व्हावी व गुन्ह्यातील तपासी अंमलदार,आरोपी तथा वैद्यकीय अधिकारी यांचे भ्रमणध्वनी तपासण्यात यावे व आरतीच्या मृत्यूची सी.बी.आय. मार्फत चौकशीची आणि विशेष सरकारी वकील उज्वल निकम यांची नियुक्ती करावी अशी मागणी सराफ सुवर्णकार असोसिशन च्या सर्व पदाधिकारी आणि सदस्य तसेच मनमाड शहर व्यापारी महासंघाचे अध्यक्ष राजाभाऊ पारिक यांनी केली आहे
सदरील निवेदन येथील उप विभागीय कार्यालय येथे जाऊन उपविभागीय अधिकारी श्री समीर सिंह साळवे तसेच सर्कल अधिकारी यांना देण्यात आले.
राजाभाऊ पारीख, शिवसेनेचे नगरसेवक प्रवीण नाईक, सुरेश लोढा, दिलीप लोढा,सुनील भंडारी, योगेश भंडारी,योगेश ललवाणी,विनोद वर्मा, अमित सोनवणे,राजेंद्र वडनेरे,गौरव भंडारी,किशोर भंडारी, गोविंदा दांडगव्हाळ, शिवम ललवाणी,
नेमीचंद लोढा, पिंटू वानखेडे, नितीन अहिरराव, भास्कर उगले, मचींदर दराडे,मोहन भंडारी, पंकज इखणकर,दीपक बाविस्कर,संतोष बागुल,सागर दंडगव्हाळ, अशोक जाधव,राजू पिंगळे, शरद अण्णा विसपुते,ललित राय,सचिन बाविस्कर, सागर बाविस्कर,देविदास सोनवणे, शाम सोनवणे,सोमनाथ सोनवणे,विनू सोनवणे, कल्पेश बेदमुथा, कुलदीप चोटमुरादी, मनोज जंगम,दीपक बाविस्कर, विकी मोरे,अंतू भामरे,शरद पिंगळे,किशोर कासार,रवींद्र पेठकर, राजू पेटकर,प्रवीण सूर्यवंशी आदी उपस्थित होते
अरविंद शिंदे,नितीन गवळी ,राकेश ललवाणी, महावीर ललवाणी











