loader image
[ays_poll id=7]

राशिभविष्य : १८ फेब्रुवारी २०२२ !

Feb 18, 2022


मेष :- आपल्या स्वभावानुसार ठाम निर्णय घ्यावेत. इतरांवर छाप पडण्यात यशस्वी व्हाल.

वृषभ :- अनपेक्षित लाभ मिळण्याची शक्यता. जोडीदाराची उत्तम साथ मिळेल.

मिथुन :- दिवसभर कामातच व्यग्र राहाल. सारखे मत बदलू नका. कामात एकसूत्रता ठेवावी.

कर्क :- नवीन लोकांशी संपर्क होईल. जोडीदाराचा शांत स्वभाव मनात भरेल.

सिंह :- मानसिक चंचलता जाणवेल. भागीदारीत नवीन विचार मांडाल.

कन्या :- वैचारिक शांतता जपावी. कौटुंबिक खर्च आटोक्यात ठेवावा. 

तूळ :- आशावादी दृष्टीकोन ठेवावा. सर्वबाबी अभ्यासूपणे जाणून घ्या. खोट्या गोष्टींचा आधार घेऊ नका.

वृश्चिक :- संभाषणाची आवड पूर्ण कराल. सारासार विचार करूनच निर्णय घ्यावेत.

धनू :- योग्य तर्काचा वापर कराल. तुमच्या बोलण्याने लोक प्रभावित होतील.

मकर :- सामुदायिक वादात लक्ष घालू नका. जुनाट विचार करणे सोडून द्यावे.

कुंभ :- आपले प्रभुत्व दाखवाल. अचानक धनलाभ संभवतो. वैचारिक स्थिरता ठेवावी.

मीन :- कागदपत्रांची नीट छाननी करावी. फसवणुकीपासून सावध राहावे.


अजून बातम्या वाचा..

.