loader image
[ays_poll id=7]

हाडबीची शेंडी गिर्यारोहक दुर्घटना – पर्यटन संचालनालयाने घेतली दखल, इंद्रप्रस्थ ट्रेकर्सला बजावली नोटीस

Feb 18, 2022

मनमाड शहराजवळील हाडबिची शेंडी या सुळक्यावर २ फेब्रुवारी रोजी अहमदनगरच्या इंद्रप्रस्थ ट्रेकर्स ग्रुपच्या वतीने आरोहण व प्रस्तरारोहण उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मात्र प्रस्तरारोहण करताना इंद्रप्रस्थ ट्रेकर्स ग्रुप चे मुख्य गिर्यारोहक मयूर दत्तात्रय म्हस्के आणि अनिल शिवाजी वाघ या दोघांचा मृत्यू झाला होता.या घटनेची गंभीर दखल पर्यटन संचालनालय कार्यालयाने घेतली असून नगरच्या इंद्रप्रस्थ ट्रेकर्स ग्रुपला नोटीस बजावली असून संदर्भाकित शासन निर्णय अंतर्गत नोंदणी केली आहे का? केली असल्यास नोंदणी पत्रक सादर करण्यास कळविले आहे तसेच आयोजकांनी ट्रेकिंग चे अधिकृत प्रशिक्षण घेतले आहे का? असा सवाल ही उपस्थित करण्यात आला आहे.ट्रेकिंग साठी वापरण्यात आलेली सुरक्षा साधने कोणती होती व साधनांची उपयोगिता कधी पर्यंत होती? सुरक्षेसाठी कुठल्या उपाययोजना करण्यात आल्या होत्या व संदर्भिय शासन निर्णयातील मार्गदर्शक सूचनांचे व बंधनकारक बाबींचे पालन झाले आहे का? आदी सर्व मुद्यांचे दोन दिवसात स्पष्टीकरण मागितले असल्याचे कळते. सदर दुर्घटनेनंतर राज्यात विविध ठिकाणी साहसी गिर्यारोहणाचे उपक्रम राबविणाऱ्या संस्थांमध्ये खळबळ माजली आहे.

अजून बातम्या वाचा..

भुमी क्रिकेट अकॅडमीतील स्वामी दिंडे , खुशाल परळकर, गौरव निते व हसनेन शेख यांची नंदुरबार जिल्हा क्रिकेट असोसिएशन अंडर 19* संघात निवड

भुमी क्रिकेट अकॅडमीतील स्वामी दिंडे , खुशाल परळकर, गौरव निते व हसनेन शेख यांची नंदुरबार जिल्हा क्रिकेट असोसिएशन अंडर 19* संघात निवड

* BCCI अंतर्गत असलेल्या महाराष्ट्र क्रिकेट आसोसिएशन आयोजीत आमंत्रितांच्या स्पर्धेसाठी (...

read more
के आर टी हायस्कूल अँड जुनियर कॉलेजमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन साजरा करण्यात आला

के आर टी हायस्कूल अँड जुनियर कॉलेजमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन साजरा करण्यात आला

. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे प्राचार्य मुकेश मिसर यांच्या हस्ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर...

read more
मार्गशीर्ष मास संकष्ट चतुर्थी निमित्त रविवार दिनांक 07/12/2025 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम

मार्गशीर्ष मास संकष्ट चतुर्थी निमित्त रविवार दिनांक 07/12/2025 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम

मनमाड शहराचे आराध्य दैवत आणि नवसाला पावणार गणपती म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध असणाऱ्या वेशीतील श्री...

read more
सेंट झेवियर हायस्कूलमध्ये थोर समाजसुधारक, क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची पुण्यतिथी संपन्न

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये थोर समाजसुधारक, क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची पुण्यतिथी संपन्न

मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये थोर समाजसुधारक, क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची...

read more
.