Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

कवी रविन्द्रनाथ टागोर इंग्लिश मिडीयम स्कूल, मनमाड येथे शिवजयंती साजरी

Feb 19, 2022

कवी रविन्द्रनाथ टागोर इंग्लिश मिडीयम स्कूल, मनमाड येथे शिवजयंती साजरी करण्यात आली. के. जी. विभागातील मुलांनी छत्रपती शिवाजी महाराज, जिजामाता, मावळे यांच्या अतिशय सुंदर अशा वेशभूषा केल्या होत्या. त्यासाठी पालकांनी पण उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. आराध्या झाल्टे, कुश पाटील, स्वरांजली मोरे, तेजस्विनी चव्हाण, प्रसन्न पाटील, आरव नेरकर, दिव्या जगताप, निम्रित छाबरिया या विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बद्दल आपले मनोगत व्यक्त केले. उपस्थितांनी चिमुकल्यांच्या धाडसाचे कौतुक केले. या प्रसंगी प्राचार्य श्री. मुकेश मिसर अध्यक्ष स्थानी होते तसेच शाळेचे जनरल सेक्रेटरी श्री. वैभव कुलकर्णी, मुख्याध्यापक श्री. दिपक व्यवहारे, श्री. धनंजय निभोंरकर यांनी विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत छत्रपतींच्या प्रतिमेस अभिवादन केले. प्राचार्य श्री. मिसर सरांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल खूप छान माहिती दिली. शाळेच्या सहशिक्षिका गायत्री मिश्रा यांनी कार्यक्रमाचे सूत्र संचालन केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सौ. अनिता शाकद्विपी, सौ. राजश्री बनकर, सौ. क्षीरसागर, सौ. बिडवे, कु. भारती पवार यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

अजून बातम्या वाचा..

नगर परिषद इमारतीसाठी दहा कोटींचा निधी मंजूर – आमदार कांदे यांच्या पाठपुराव्याला यश

नगर परिषद इमारतीसाठी दहा कोटींचा निधी मंजूर – आमदार कांदे यांच्या पाठपुराव्याला यश

मनमाड : राज्य शासनातर्फे नगर परिषदांना वैशिष्टपूर्ण कामासाठी विशेष अनुदान या योजनेंतर्गत मनमाड नगर...

read more
दोन लाखाची लाच स्वीकारताना वीज वितरण कंपनीच्या दोन अधिकाऱ्यांना एसीबी ने केली अटक

दोन लाखाची लाच स्वीकारताना वीज वितरण कंपनीच्या दोन अधिकाऱ्यांना एसीबी ने केली अटक

धुळे विभागांतर्गत महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी अंतर्गत केलेल्या वीज जोडणीचे बिल विना त्रुटी...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]