मेष :- कामावर अधिक लक्ष केंद्रित करावे. समोरील प्रत्येक गोष्टीत रस घ्याल.
वृषभ :- दिवस घाईगडबडीत जाईल. बुद्धिकौशल्याने कामे करण्याकडे कल राहील.
मिथुन :- कौटुंबिक सौख्याकडे लक्ष द्यावे. घरगुती कामे सुरळीत पार पडतील.
कर्क :- बौद्धिक छंद जोपासाल. स्वभावात काहीसा लहरीपणा येईल.
सिंह :- भागीदारीच्या कामात काही नवीन बदल करावेत. कचेरीच्या कामात वेळ लागू शकतो.
कन्या :- आपल्या इच्छेला अधिक महत्व द्याल. इतरांबद्दल मत बनवण्याआधी विचार करावा.
तूळ :- हातातील अधिकाराची जाणीव ठेवावी. आर्थिक उलाढाल सावधगिरीने करावी.
वृश्चिक :- व्यावसायिक लाभ सुनिश्चित करावा. व्यापारी वर्ग अपेक्षित लाभाने समाधानी राहील.
धनू :- जबाबदारी लक्षात घेऊन वागावे. कोणतेही धाडस करतांना सावधानता बाळगावी.
मकर :- धार्मिक स्थळांना भेट द्याल. थोर व्यक्तींविषयी आदर व्यक्त कराल.
कुंभ :- मित्रांशी वादाचे प्रसंग येऊ शकतात. इतरांच्या मताचा विचार करावा.
मीन :- बदलीची चिन्हे दिसतील. तुमच्या कार्यपद्धतीचे कौतुक केले जाईल.




