loader image
[ays_poll id=7]

कर्मचाऱ्यांना अद्ययावत करण्यासाठी प्रशिक्षण केंद्राची भूमिका महत्त्वाची:संचालक डॉ. नरेश गिते; एकलहरे प्रशिक्षण व सुरक्षा केंद्र येथे भेट 

Feb 21, 2022

ऊर्जा क्षेत्रात  येणारे नवनवीन तंत्रज्ञान व माहिती,  महावितरण कंपनी समोरील आव्हाने व उपाय तसेच तत्पर  ग्राहक सेवा या संबधीचे उत्कृष्ठ दर्जाचे प्रशिक्षण व ज्ञान महावितरणमधील  अधिकारी, अभियंते व कर्मचारी यांना  देऊन त्यांचे कौशल्य व  दृष्टिकोन विकसित करून त्यांना अद्ययावत करण्यासाठी प्रशिक्षण केंद्राची भूमिका महत्त्वाची असल्याचे  प्रतिपादन  महावितरणचे संचालक (मानव संसाधन) डॉ. नरेश गिते यांनी केले.

महावितरणच्या प्रशिक्षण व सुरक्षा केंद्र, एकलहरे येथे  गुरुवारी डॉ. नरेश गिते यांनी भेट देऊन  पाहणी केली व संवाद साधला त्यावेळी ते  बोलत होते. ऊर्जा  क्षेत्रात ननवीन बदल व  संशोधन  होत असून या बदलाची  व संशोधनाची माहिती प्रशिक्षणाच्या  माध्यमातून  कर्मचाऱ्यांना देऊन काळानुरूप बदल  घडविणे तसेच  कंपनीमध्ये नवीन रुजू झालेल्या  प्रशिक्षणार्थीना कंपनीच्या ध्येय आणि धोरण याची माहिती देऊन त्यांना ग्राहक सेवेसाठी सर्वार्थाने सक्षम बनविणे अत्यंत गरजेचे आहे, असे संचालक (मासं) डॉ. गिते  सूचित केलॆ. यावेळी  नव्याने विकसित केलेले सर्किट ब्रेकर सिम्युलेटर मॉडेलचे उदघाटन डॉ. नरेश गिते यांनी  केले. त्यामुळे प्रशिक्षणार्थीकडून ग्राहकाभिमुख सेवा देणे सुलभ होऊन वितरण प्रणालीमध्ये  ‘विना अपघात महावितरण’ या ध्येयाकडे यशस्वीरीत्या वाटचाल करण्यासाठी निश्चितच या प्रणालीचा उपयोग होणार असल्याचे सांगितले . 
 प्रशिक्षण व सुरक्षा केंद्र येथे असलेली माहिती तंत्रज्ञान व सुविधा, ग्रंथालय,  विविध प्रकारच्याप्रयोगशाळा,  अद्यावत असलेले सिम्युलेटर, नवीन तंत्रज्ञानाचे वीज मीटर, सुरक्षा साधने, संशोधन पत्रिका, अंतर्गत गुणवत्ता या तंत्रज्ञानाबाबत त्यांनी माहिती घेतली. 
भारत सरकारच्या विद्युत मंत्रालयाशी संलग्न असलेलया  केंद्रीय विद्युत प्राधिकरण यांनी या प्रशिक्षण व सुरक्षा केंद्रास प्रथम श्रेणीच्या दर्जाचे नामांकन केलेले असून  हे प्रशिक्षण केंद्र आय.एस.ओ.-२००९:२०१५ नुसार प्रमाणित असल्याची माहिती  यावेळी मुख्य महाव्यवस्थापक देवेंद्र सायनेकर यांनी दिली. तसेच  विविध अभियांत्रिकी महाविद्यालय यांच्याशी झालेल्या तंत्रज्ञ विकास संयुक्त सहयोग सामंजस्य करारानुसार तंत्रज्ञान व माहिती देवाणघेवाण, विविध कार्यशाळेचे आयोजन, संशोधन पत्रिका, विविध विषयात अधिव्याख्याता या संपूर्ण कार्यप्रणालीची माहिती तसेच महावितरण कंपनीतील कर्मचाऱ्यांचे ज्ञानवाढीकरिता व त्यांना आणखी सक्षम करण्यासाठी प्रयत्नरत  राहील अशी  ग्वाही मुख्य महाव्यवस्थापक देवेंद्र सायनेकर यांनी  दिली. या भेटी दरम्यान  प्रशिक्षण व सुरक्षा केंद्र, एकलहरे येथील अभियंते अधिकारी व कर्मचारी यांनी परिश्रम घेऊन नियोजन केले.

अजून बातम्या वाचा..

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जन्मदिनानिमित्त बालदिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जन्मदिनानिमित्त बालदिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला

मनमाड -येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या...

read more
कॅथॉलिक धर्मप्रांताचे बिशप Barthol bareto यांनी स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिवस 14 नोव्हेंबर बालदिन निमित्त पूर्वसंध्येला मनमाड धर्मग्रामाला भेट दिली

कॅथॉलिक धर्मप्रांताचे बिशप Barthol bareto यांनी स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिवस 14 नोव्हेंबर बालदिन निमित्त पूर्वसंध्येला मनमाड धर्मग्रामाला भेट दिली

आज दिनांक 13 नोव्हेंबर 2025 रोजी नाशिक कॅथॉलिक धर्मप्रांताचे बिशप Barthol bareto यांनी स्वतंत्र...

read more
कवी रबिंद्रनाथ टागोर हायस्कूल व ज्यु. कॉलेज, मनमाडची केंद्र सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागाअंतर्गत इन्स्पायर अवॉर्ड प्रदर्शनात सर्वोत्तम कामगिरी करीत राज्यस्तरावर निवड झालेली आहे. 

कवी रबिंद्रनाथ टागोर हायस्कूल व ज्यु. कॉलेज, मनमाडची केंद्र सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागाअंतर्गत इन्स्पायर अवॉर्ड प्रदर्शनात सर्वोत्तम कामगिरी करीत राज्यस्तरावर निवड झालेली आहे. 

दिनांक :12/11/2025   कवी रबिंद्रनाथ टागोर हायस्कूल व ज्यु. कॉलेज, मनमाडची केंद्र सरकारच्या...

read more
मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये आदिवासी क्रांतिकारक बिसरा मुंडा यांची जयंती संपन्न

मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये आदिवासी क्रांतिकारक बिसरा मुंडा यांची जयंती संपन्न

मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये आदिवासी क्रांतिकारक बिसरा मुंडा यांची जयंती संपन्न झाली....

read more
नामनिर्देशनपत्रातील माहितीसोबत संकेतस्थळावर कागदपत्र अपलोड करण्याची आवश्यकता नाही शनिवारी (ता. १५) देखील नामनिर्देशनपत्र स्वीकारणार

नामनिर्देशनपत्रातील माहितीसोबत संकेतस्थळावर कागदपत्र अपलोड करण्याची आवश्यकता नाही शनिवारी (ता. १५) देखील नामनिर्देशनपत्र स्वीकारणार

  मुंबई, दि. १३ - नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या निवडणुकांकरिता संकेतस्थळावर फक्त...

read more
एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु.कॉलेज,मनमाड मध्ये भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद जयंती उत्साहात साजरी

एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु.कॉलेज,मनमाड मध्ये भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद जयंती उत्साहात साजरी

  *मनमाड (दि. ११ नोव्हेंबर) - एच.ए.के.हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, मनमाड येथे भारताचे पहिले...

read more
क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नाशिक आयोजित

क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नाशिक आयोजित

क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी...

read more
.