मेष :- जिभेवर साखर ठेवून वागाल. लहान मुलांच्यात रमून जाल. नवीन लोक संपर्कात येतील. अतिविचार करू नये.
वृषभ :- उघडपणे बोलणे टाळाल. कमिशन मधून लाभ मिळेल. अधिकार्यांचा सल्ला घ्यावा लागेल. भागीदारीचे संबंध सुधारतील.
मिथुन :- फसवणुकीपासून सावध राहा. जामीन राहताना पूर्ण विचार करावा. नातेवाईकांच्या मदत मिळेल. चोरांपासून सावध राहावे. कामाचा आनंद मिळेल.
कर्क :- स्वत:च्या मतावर आग्रही राहाल. छंद जोपासण्यात वेळ घालवाल. सहकुटुंब लहान प्रवास कराल. पोटाची तक्रार जाणवू शकते.
सिंह :- घरगुती कामे मनापासून कराल. जोडीदाराशी विचारविनिमय कराल. क्षुल्लक कारणांवरून गैरसमज करून घेऊ नका. मुलांचे वागणे विरोधी वाटू शकते.
कन्या :- कौटुंबिक समस्येतून मार्ग काढावा. आर्थिक गरजेचं हिशोब मांडावा. मोठ्या लोकांशी संपर्क होईल. जवळचा प्रवास घडेल.
तूळ :- आपले प्रभुत्व गाजवाल. आरोग्यात सुधारणा होईल. उत्तम वैवाहिक सौख्य लाभेल. कामातून समाधान मिळवाल.
वृश्चिक :- गप्पा गोष्टींची मैफल जमवाल. मित्रा मैत्रिणींचा गोतावळा जमवाल. दिवस मनाजोगा व्यतीत कराल. व्यसनांपासून दूर राहावे.
धनू :- नातेवाईकांशी सलोखा ठेवावा. अनाठायी खर्च करू नये. मानसिक चांचल्य जाणवेल. महत्वाकांक्षा वाढीस लागेल.
मकर :- आपल्या इच्छेला अधिक महत्व द्यावे. धार्मिक यात्रेसाठी नाव नोंदवाल. सामुदायिक गोष्टींपासून दूर राहावे. जुन्या गोष्टी उगाळत बसू नका. अपवादाकडे दुर्लक्ष करा.
कुंभ :- मित्रांशी वादावादी संभवते. कामे चिकाटीने पूर्ण कराल. वेळेचे महत्व समजून वागाल. तुमची समाजप्रियता वाढेल.
मीन :- गोड बोलून उद्दिष्ट साध्य कराल. लबाड लोकांपासून दूर राहावे. खोट्या गोष्टींचा आधार घेऊ नका. हाताखालील कामाला उत्तम नोकर मिळतील.




