आज शिंगवे येथे गावालगतच्या व इतर परिसरात नवीन सिमेंट प्लग बंधारे बांधण्यासाठी व दुरुस्तीच्या कामासाठी किरण बोरसे,आत्माराम खताळ यांनी मागणी केली होती.त्याची दखल घेत आज शेख यांनी आज भेट दिली.जलसंधारण खात्याच्या वतीने अनेक ठिकाणी सिमेंट बंधारे बांधण्यासाठी लवकरच मोजमाप करून सर्वे करून काम चालू करण्यात येईल अशी माहिती शेख यांनी दिली.यावेळी जलसंधारण विभागाचे वरिष्ठ उपविभागीय अधिकारी शेख समवेत किरण बोरसे,समाजसेवक आत्माराम खताळ ,पुंडलिक उगले,अरुण न्याहारकर सह जलसंधारण खात्याचे अधिकारी उपस्थित होते.
संत झेवियर हायस्कूल शाळेचा दहावीचा निकाल 98.30%
सेंट झेवियर हायस्कूलमध्ये एसएससी परीक्षेचा निकाल एकूण विद्यार्थी 177 पास 174 शाळेचा एकूण निकाल...










