मेष :- झोपेची तक्रार जाणवेल. खर्च काही प्रमाणात वाढू शकतो. लहानशा पराजयाने निराश होऊ नका. इतरांवर आपली छाप पाडाल.
वृषभ :- स्वत:चा फायदा करण्यात यशस्वी व्हाल. अधिकारांचे मार्गदर्शन मिळेल. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. व्यवहारी बुद्धिमत्ता वापराल. लेखकांच्या लिखाणाला गती येईल.
मिथुन :- हातातील कामात यश येईल. दैनंदिन कमाई चांगली होईल. मोठ्या लोकांच्या ओळखी वाढतील.
कर्क :- कलेतून चांगले मानधन मिळेल. आपली पत सांभाळण्याचा प्रयत्न कराल. वडीलधार्यांचे मत विरोधी वाटू शकते. मानसिक ताणतणाव दूर करावा.
सिंह :- प्रिय व्यक्तीशी मतभेद संभवतात. मुलांच्या वागण्याचा गांभीर्याने विचार करावा. गुरुकृपेचा लाभ होईल.
कन्या :- चार-चौघांत विरोधी मत मांडू नका. जोडीदाराचा काहीसा दबाव राहील. कौटुंबिक कामांतून धनप्राप्ती होईल.
तूळ :- जोडीदाराचे मत मान्य करावे लागेल. कामाच्या ठिकाणी तुमचा प्रभाव राहील. मुलांच्या चिंता लागून राहतील.
वृश्चिक :- स्वत:चेच मत खरे कराल. आवश्यकता नसताना सुद्धा खर्च होईल. कर्तबगारीला चांगला वाव आहे.
धनू :- नातेवाईकांच्या समस्या सोडवाल. स्वत:मध्ये काही बदल कराल. अडथळ्यातून मार्ग काढावा.
मकर :- मनातील आकांक्षा पूर्ण होईल. त्रासातून मार्ग निघेल. वरिष्ठांकडून कामाचे कौतुक केले जाईल.
कुंभ :- नवीन मित्र जोडावेत. हस्त कलेसाठी वेळ काढावा. सामुदायिक भांडणापासून दूर राहावे. मानापमानाच्या प्रसंगाकडे दुर्लक्ष करावे.
मीन :- अति श्रमामुळे थकवा जाणवेल. कौटुंबिक सौख्यास प्राधान्य द्याल. लपवाछपवीचे व्यवहार करू नका.




