ऑल इंडिया एससी एसटी रेल्वे एम्प्लाईज असोसिएशन मनमाड तर्फे रेल्वे कम्युनिटी हॉल व डॉ बाबासाहेब आंबेडकर रेल्वे क्रिडांगण खुले करण्याची मागणी करण्यात आली.
झोनल सचिव सतिश भाऊ केदारे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने मंडल रेल प्रबंधक भुसावल व मुख्य कारखाना प्रबंधक मनमाड यांना निवेदन देऊन केली.
दोन वर्षांपासून रेल्वे कम्युनिसटी हॉल व डॉ बाबासाहेब आंबेडकर रेल्वे क्रिडांगण कोरोना प्रतिबंधक कारणांमुळे बंद करण्यात आले होते.
पण राज्य सरकारने काही नियम घालून लग्नं हॉल व क्रिडांगण खुले केली आहे.
मार्च ते मे हे महिन्यात लग्न कार्य मोठ्या प्रमाणात करण्यात येतात व यांचं महिन्यात मुलांना सुट्ट्या असतात.या धर्तीवर ऑल इंडिया एससी एसटी रेल्वे एम्प्लाईज असोसिएशन मनमाड तर्फे सदर मागणी करण्यात आली.
या शिष्टमंडळात झोनल कार्यकारिणी सदस्य
प्रवीण अहिरे, विजय गेडाम, किरण अहिरे, विनोद खरे यांचा समावेश होता.
बुधलवाडी येथे सभामंडप भूमिपूजन संपन्न
मनमाड - नांदगाव विधानसभेचे आमदार सुहास आण्णा कांदे यांच्या विशेष प्रयत्नातून मनमाड येथील ( प्रभाग...











