loader image

अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल मध्ये  महिला दिवस उत्साहात  साजरा

Mar 11, 2024





प्रतिनिधी : अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल व समिज्ञा फाउंडेशन  च्या  संयुक्त विद्यमाने  जागतिक महिला दिन मोठ्या उत्सवात साजरा करण्यात आला. याप्रसंगी मेडिकल डायरेक्टर डॉ सुशील पारख म्हणाले  , महिलांमुळेच खऱ्याअर्थाने जगाने सर्वच क्षेत्रात क्रांती केली आहे. कुटुंबापासून ते समाजाच्या शेवटच्या घटकांपर्यन्त महिलांचे योगदान अतुलनीय आहे.
महिला समाजाच्या आधारस्तंभ असून आपल्या जबाबदाऱ्या सांभाळताना  आपल्या आरोग्यालाही जपा, असा मौलिक संदेश केंद्र प्रमुख अनुप त्रिपाठीं   यांनी या वेळी मार्गदर्शन करतांना दिला.
कर्तृत्वान महिला सन्मान सोहळ्यात समाजासाठी भरीव कामगिरी करण्याऱ्या महिलांचा  सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले. नृत्य कला, प्रश्न मंजुषा खेळात उपस्थित महिलांनी उत्तस्पफूर्त सहभाग नोंदवला व बक्षिसांची  लयलूट केली. या प्रसंगी मेडिकल डायरेक्टर डॉ सुशील पारख , सेंटर हेड  अनुप त्रिपाठीं  ,  हृदय विकार तज्ञ  डॉ कांचन  भंबारे , स्त्रीरोग व प्रसूतीशास्त्र तज्ञ डॉ प्रणिती संघवी डॉ प्रणिता संघवी , डॉ अश्विनी पवार ,  , स्त्रीरोग व भ्रूणशास्त्र तज्ञ डॉ  उज्जमा , दंत व सौंदर्य शास्त्र  तज्ञ डॉ स्नेहल धात्रक  मार्केटिंग हेड पियुष नांदेडकर यांच्यासह  रुग्णालयातील डॉक्टर परिचारिका व कर्मचारी मोठ्या संख्येने  उपस्थिती होते.  कार्यक्रम यशस्वीतेसाठी समिज्ञा फाउंडेशनचे चेअरमन समीर तोरसकर , सचिव प्रज्ञा तोरसकर , डॉ समीर लासुरे  यांनी  परिश्रम घेतले.


अजून बातम्या वाचा..

मनमाड महाविद्यालयाच्या विद्यार्थ्याला रेल्वे रिक्रूटमेंट बोर्ड परीक्षेत यश, प्राचार्यांनी केला सत्कार.

मनमाड महाविद्यालयाच्या विद्यार्थ्याला रेल्वे रिक्रूटमेंट बोर्ड परीक्षेत यश, प्राचार्यांनी केला सत्कार.

मनमाड – महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला, विज्ञान व वाणिज्य स्वायत्त महाविद्यालय, मनमाड येथील...

read more
श्री निलमणी गणेश मंदिर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे महाराष्ट्र तील पूरग्रस्ता साठी वस्तू स्वरूपात मदती चे आवाहन

श्री निलमणी गणेश मंदिर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे महाराष्ट्र तील पूरग्रस्ता साठी वस्तू स्वरूपात मदती चे आवाहन

मनमाड - शहरात गेल्या 1997 पासून सलग 29 वर्ष आम्ही परंपरा पाळतो..!! आम्ही संस्कृती चे रक्षण करतो हे...

read more
.