loader image
[ays_poll id=7]

फलक रेखाटन – दिनांक २७ फेब्रुवारी २०२२. मराठी राजभाषा दिन

Feb 27, 2022


मराठी भाषेतील अग्रगण्य कवी लेखक नाटककार ,कथाकार व समीक्षक, ज्ञानपीठ मिळवणारे दुसरे साहित्यिक विष्णू वामन शिरवाडकर (कुसुमाग्रज) यांचा जन्मदिवस हा मराठी राजभाषा दिवस म्हणून साजरा केला जातो. हा दिवस आपल्या मातृभाषेबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे.” लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी ,जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ,धर्म पंथ जात एक जाणतो मराठी, एवढ्या जगात माय मानतो मराठी..!” मराठी असे आमुची बोली ज्या भाषेने आम्हाला विचार करायला शिकवलं, लिहायला शिकवलं , जगण्याची कला शिकवली ती माय मराठी आपल्यासाठी एक भाषा नसून ममतेचे वात्सल्याचे बोल आहेत. “जीवन जिथून सुरू होईल त्याच अक्षराने प्रारंभ होई अशी माय मराठी तिचे अद्याक्षरही ‘अ आ ई ‘…! “जसे आईचे बोल लेकरांसाठी हळुवार, प्रेमळ असतात आणि प्रसंगी कठोरही असतात तशी आपली माय मराठी आहे. हळूवार, गोड, लाघवी प्रेमळ शब्दांनी सजणारी व प्रसंगी वज्राहून कठीण शब्दाने वार करणारी जीथे फक्त शब्दच सगळं काम करतात.चला आपल्या मराठी भाषेला समृद्ध करूया,,, माय मराठीचा गौरव व जागर करूया,,, माय मराठीचा उत्सव साजरा करुया..!!
– फलक रेखाटन – देव हिरे. (कलाशिक्षक, ‘शिक्षण मंडळ भगूर’ संचालित ,नूतन माध्यमिक विद्यालय भाटगाव. ता.चांदवड. जि.नाशिक.)


अजून बातम्या वाचा..

श्री निलमणी गणेश मंदिर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे महाराष्ट्र तील पूरग्रस्ता साठी वस्तू स्वरूपात मदती चे आवाहन

श्री निलमणी गणेश मंदिर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे महाराष्ट्र तील पूरग्रस्ता साठी वस्तू स्वरूपात मदती चे आवाहन

मनमाड शहरात गेल्या 1997 पासून सलग 29 वर्ष आम्ही परंपरा पाळतो..!! आम्ही संस्कृती चे रक्षण करतो हे...

read more
अश्विन मास संकष्ट चतुर्थी निमित्त शुक्रवार दिनांक 10/020/2025 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम

अश्विन मास संकष्ट चतुर्थी निमित्त शुक्रवार दिनांक 10/020/2025 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम

मनमाड शहराचे आराध्य दैवत आणि नवसाला पावणार गणपती म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध असणाऱ्या वेशीतील श्री...

read more
.