Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

मनमाड सार्वजनिक वाचनालय मध्ये मराठी राजभाषा दिन आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे ५६ व्या पुण्यतिथी निमित्ताने अभिवादन

Feb 27, 2022

कोरोना च्या मोठया संकट काळातही वाचन चळवळ जोपासणाऱ्या व मनमाड शहराचे सांस्कृतिक वैभव असणाऱ्या आणि व्रत अखंड वाचक सेवेचे हे ब्रीद वाक्य घेऊन शतकोत्तर वाटचाल करणाऱ्या मनमाड सार्वजनिक वाचनालय मध्ये जागतिक मराठी राजभाषा दिना (स्वर्गीय कवी कुसुमाग्रज (वि वा शिरवाडकर )जयंती) निमित्ताने तसेच भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील महान क्रांतीकारक स्वर्गीय स्वातंत्र्य वीर सावरकर (विनायक दामोदर सावरकर) यांचे ५६ व्या पुण्यतिथी निमित्ताने संयुक्त कार्यक्रमा चे आयोजन करण्यात आले सर्व प्रथम महान मराठी व हिंदी गायिका भारतरत्न स्वर्गीय लतादिदी मंगेशकर, मराठी चित्रपट अभिनेते स्वर्गीय रमेश देव ,मराठी साहित्यकार डॉ अनिल अवचट यांचे सह मराठी भाषा संवर्धना साठी कार्य करणाऱ्या सर्व ज्ञातअज्ञात दिवंगताना सामूहिक श्रद्धांजली अर्पण करण्यात आली तदनंतर मनमाड सार्वजनिक वाचनालय चे माजी अध्यक्ष व प्रसिद्ध कवी प्रदीप गुजराथी यांचे हस्ते कवी कुसुमाग्रज आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले तसेच स्वातंत्र्य युद्धातील क्रांतीकारक चंद्रशेखर आझाद यांचे पुण्यतिथी निमित्ताने त्यांना ही आदरांजली अर्पण करून अभिवादन करण्यात आहे मनमाड सार्वजनिक वाचनालय चे अध्यक्ष नितीन पांडे ,सचिव कल्पेश बेदमुथा ,संचालक नरेश गुजराथी,माजी अध्यक्ष सुरेश शिंदे प्रदेनश खांदाट आदी मान्यवर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते कार्यक्रम चे प्रास्तावित आणि सूत्र संचालन सचिव कल्पेश बेदमुथा यांनी केले मराठी भाषा टिकवण्यासाठी वाचन संस्कृती टिकली पाहिजे ,आणि मनमाड सार्वजनिक वाचनालय ने हे कठीण कार्य सर्व वाचकांच्या सहकार्य ने निरंतर सुरु ठेवले आहेअसे अध्यक्ष नितीन पांडे यांनी या प्रसंगी सांगितले तर कवी प्रदीप गुजराथी यांनी कवी कुसुमाग्रज कवी वीर सावरकर यांचे मराठी भाषे करीता असणाऱ्या अतुलनीय योगदान बद्दल अभ्यास पूर्ण माहिती विशद केली या कार्यक्रमाच्या निमित्ताने वीर सावरकर आणि कवी कुसुमाग्रज यांनी लिहिलेल्या आणि यांचे वर आधारित सर्व पुस्तके व ग्रंथ साहित्य चे प्रदर्शन वाचकांन साठी उपलब्ध करण्यात आले होते मनमाड सार्वजनिक वाचनालय च्या असंख्य वाचकांनी या दोन्ही महान कवींच्या ग्रंथ संपदे चा लाभ घेतला या कार्यक्रमास अक्षय सानप रितिक चव्हाण मनमाड सार्वजनिक वाचनालयच्या ग्रंथपाल सौ संध्या गुजराथी, हेमंत मटकर ,सौ नंदिनी फुलभाटी यांचे सह मोठ्या संख्येने वाचक उपस्थित होते कार्यक्रम चे संयोजन मनमाड सार्वजनिक वाचनालय चे अध्यक्ष नितीन पांडे ,सचिव कल्पेश बेदमुथा यांनी केले

अजून बातम्या वाचा..

दीपक शर्मा यांचे निधन

दीपक शर्मा यांचे निधन

श्री राजस्थानी बालाजी मंदिर ट्रस्ट चे सक्रिय सदस्य राजेश शर्मा, गौरव शर्मा यांचे मोठे बंधू दीपक...

read more
बघा व्हिडिओ – फलक रेखाटन – सामाजिक ऐक्य राखणाऱ्या आजच्या अक्षय तृतीया व रमजान ईद या पवित्र सणाच्या फलक रेखाटनातून हार्दिक शुभेच्छा !

बघा व्हिडिओ – फलक रेखाटन – सामाजिक ऐक्य राखणाऱ्या आजच्या अक्षय तृतीया व रमजान ईद या पवित्र सणाच्या फलक रेखाटनातून हार्दिक शुभेच्छा !

देव हिरे . ( कलाशिक्षक , शिक्षण मंडळ भगूर, संचालित नूतन माध्यमिक विद्यालय भाटगाव....

read more
मनमाड ला माघारीच्या दिवशी मार्केट कमिटीतच फ्रीस्टाइल – शिंदे आणि ठाकरे गट एकमेकांना भिडले

मनमाड ला माघारीच्या दिवशी मार्केट कमिटीतच फ्रीस्टाइल – शिंदे आणि ठाकरे गट एकमेकांना भिडले

मनमाड बाजार समितीच्या निवडणुकीत आज उमेदवारी माघारीवरून आमदार सुहास कांदे आणि त्यांचे विरोधक...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]