Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची 56 वी पुण्यतिथी निमित्य श्री परशुराम प्रतिष्ठान तर्फे त्यांना विनम्र अभिवादन

Feb 28, 2022

काल रविवार रोजी चिंतामणी मंगल कार्यालय मनमाड येथे श्री परशुराम प्रतिष्ठान मनमाड तर्फे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना यांच्या 56 व्या पुण्यतिथी निमित्य विनम्र अभिवादन करण्यात आले.

यावेळी श्री अरुण वाघमारे व श्री द्वारकानाथ झांबरे सर यांच्या हस्ते दिपप्रज्वलन व श्री भगवान परशुराम व स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करण्यात आले त्यानंतर सामूहिक रित्या जयस्तुते गायन करून अभिवादन करण्यात आले ,कु.श्रावणी पुरंदरे हिने सावरकरांविषयी माहिती सादर केली, ची.वेदांत जोशी याने सावरकरांच्या अंदमानातील आठवणींना उजाळा दिला तसेच कु.मानसी जोशी हिने “ने मजसी ने” हे गीत सुरेल आवाजात सादर केले.त्याबद्दल या सर्वांना प्रतिष्ठान तर्फे छोटेसे बक्षीस देण्यात आले. हिंदुरुदय सम्राट स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी समस्त हिंदुत्वासाठी केलेले अफाट कार्य तसेच आजन्म मातृभूमीच्या स्वातंत्रतेसाठी केलेले प्रयत्न व आपल्या देहा चे काम पूर्ण झाले आहे असे वाटल्यानंतर स्वतः आत्मार्पण करणारे एकमेवाद्वितीय स्वातंत्र्यवीर सावरकर हेच होत, सावरकरांची जयंती ,पुण्यतिथी ही सार्वजनिकरित्या सर्व स्तरावर सर्व हिंदुत्ववादी संस्थान मार्फत साजरी केली जात नाही,याबद्दल खूप खेद वाटतो, स्वातंत्र्यवीर यांचे कार्य पाहता शेवटपर्यंत दुर्लक्षित झालेले व योग्य तो सन्मान स्वातंत्र्यनंतरही व आताही यांना मिळालेला नाही,असे प्रतिपादन श्री समीर कुलकर्णी यांनी केले.यावेळी श्री आनंद काकडे ,श्री शशिकांत भागवत ,श्री संजय राक्षे ,श्री प्रकाश गाडगीळ सर, श्री विजय पुरंदरे, श्री विक्रांत फाटक, श्री प्रकाश कुलकर्णी, श्री हेमंत पेंडसे, श्री अनंता कुलकर्णी तसेच वेदिका ब्राह्मण महिला मंडळ उपस्थित होते कार्यक्रमाची सांगता पसायदानाने करण्यात आली.

अजून बातम्या वाचा..

फुले शाहू आंबेडकर मुस्लिम विचार मंच व संभाजी ब्रिगेड नाशिक जिल्हा यांच्यावतीने राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती साजरी

फुले शाहू आंबेडकर मुस्लिम विचार मंच व संभाजी ब्रिगेड नाशिक जिल्हा यांच्यावतीने राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती साजरी

फुले शाहू आंबेडकर मुस्लिम विचारमंच व संभाजी ब्रिगेड नाशिक जिल्हा समन्वयक यांच्या संयुक्त विद्यमाने...

read more
मनमाड पाठोपाठ नांदगाव भाजपा मध्ये नाराजीनाट्य, सानप, छाजेड यांच्यावर कारवाईची मागणी

मनमाड पाठोपाठ नांदगाव भाजपा मध्ये नाराजीनाट्य, सानप, छाजेड यांच्यावर कारवाईची मागणी

नुकत्याच पार पडलेल्या नगरपालिका व नगरपंचायत निवडणुकीत महाराष्ट्रात नंबर एक राहिलेल्या भारतीय जनता...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]