सुमारे चार दशकांपासून पाणीटंचाई ची झळ सोसणाऱ्या मनमाड करांच्या अत्यंत जिव्हाळ्याच्या करंजवण – मनमाड पाणीपुरवठा योजनेसाठी प्रकल्प समितीची मान्यता मिळविण्यात आज नांदगाव तालुक्याचे आमदार सुहास अण्णा कांदे यांना यश आले.प्रकल्प समितीची बैठक आज मंत्रालयात आमदार सुहास अण्णा कांदे यांच्या उपस्थितीत संपन्न झाली.महाराष्ट्र सुवर्ण जयंती राजस्व अभियानांतर्गत मनमाड पाणीपुरवठा योजना मंजुरीसाठी मंत्रालयात २५ फेब्रुवारी रोजी नगरविकास विभागाचे प्रधान सचिव महेश पाठक साहेब यांच्या दालनात बैठक झाली.त्यात मनमाड पाणीपुरवठा योजनेच्या संबंधित सर्व आवश्यक पूर्तता करून सदरील योजना प्रशासकीय मान्यता मिळणे करिता शासन स्तरावर सादर करण्यात आली, मंजुरी मिळण्या अगोदर प्रकल्प समितीची बैठक होणे आवश्यक असल्याने सदरील बैठक आयोजित करण्यात आली. आमदार कांदे यांनी या योजनेचा सातत्याने शासन दरबारी पाठपुरावा केला.
सेंट झेवियर हायस्कूलच्या शिक्षकांचे तालुकास्तरीय स्पर्धेत सुयश
मनमाड महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद...








